Join us

'सॉरी सलमान भाई! मजा नही आया', विचित्र डान्स स्टेपमुळे भाईजान ट्रोल; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 15:41 IST

बॉलिवूडमध्ये 'पठाण'ने धुमाकूळ घातल्यानंतर आता भाईजानही सज्ज झाला  आहे.

बॉलिवूडमध्ये 'पठाण'ने धुमाकूळ घातल्यानंतर आता भाईजानही सज्ज झाला  आहे. सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' यावर्षी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाता फर्स्ट लुक आला तेव्हा भाईजानचा लुक चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. लांब केस, गॉगल  आणि वाळवंटातील शूट सर्वच दृश्य चाहत्यांच्या पसंतीस पडली. चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे यांची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. नुकतेच सिनेमातील 'नय्यो लगदा' हे गाणं रिलीज झालं आहे.

'नय्यो लगदा' गाण्यातील डान्समुळे भाईजान ट्रोल

व्हॅलेंटाईन वीक मध्ये सलमान खान चाहत्यांसाठी 'नय्यो लगदा' हे रोमॅंटिक गाणं घेऊन आला आहे. सलमानचं गाणं असो किंवा डायलॉग तो चालतोच. शिवाय सलमानच्या प्रत्येक सिनेमातील डान्स स्टेप सुद्धा हटके असते. त्यामुळे नय्यो लगदा ही प्रेक्षकांना पसंत पडेल अशी अपेक्षा होती मात्र तसं झालेलं दिसत नाही. कारण या गाण्यातील डान्स स्टेपमुळे सलमान खान प्रचंड ट्रोल होत आहे. गाण्याचे मीम्स आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'भैय्या एक डान्सर दिखाना थोडा सस्ता वाला' अशी कमेंट एकाने केली आहे.

'नय्यो लगदा' हे रोमॅंटिक गाणं संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने कंपोझ केलं आहे. सलमान आणि हिमेशची जोडी 'तेरे नाम' सिनेमापासून हिट आहे. 'किसी का भाई किसी की जान' साठी ही जोडी पुन्हा सोबत आली आहे. नय्यो लगदा गाणं कितीही छान असलं तरी त्यातील सलमानच्या डान्स स्टेपची मात्र खिल्ली उडवली जात आहे. २१ एप्रिल रोजी ईदच्या मुहुर्तावर सिनेमा रिलीज होणार आहे. सलमान खान, पूजा हेगडे शिवाय चित्रपटात भलीमोठी स्टारकास्ट असणार आहे. याशिवाय सलमान खानचा 'टायगर ३' देखील याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसलमान खाननृत्यट्रोलसोशल मीडियामिम्स