Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचं निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:30 IST

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामागचं कारण समोर आलंय

सलमान खानच्या कुटुंबातून एक वाईट बातमी समोर आली आहे. सलमानचा खास बॉडीगार्ड म्हणून प्रसिद्ध असलेला शेरा उर्फ गुरमीत सिंह जॉलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेराचे वडील सुंदर सिंह जॉली यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते, पण अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. शेराने आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली. “पप्पा... तुम्ही माझी प्रेरणा होता, माझी ताकद होता.” शेराच्या या भावनिक पोस्टमधून त्याचं वडिलांशी असलेलं भावनिक आणि प्रेमळ नातं पाहायला मिळतं.

शेराचे वडील सुंदर सिंह जॉली यांचं मुंबईतील ओशिवरा येथे राहत्या घरी निधन झालं. संध्याकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि काही जवळचे मित्र यावेळी उपस्थित होते. शेरा हा सलमान खानसोबत तीन दशकांहून अधिक काळापासून आहे. तो फक्त एक बॉडीगार्ड नाही, तर सलमान खानसाठी कुटुंबाचा सदस्य आहे. प्रत्येक कार्यक्रम, शूटिंग, किंवा प्रवासात शेरा सलमानसोबत असतो. त्यामुळे शेराच्या वडिलांच्या निधनामुळे सलमान खानही भावुक झाला आहे.

शेराच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सलमान खान सुद्धा शेराच्या कुटुंबाला भेटणार असल्याचं समजतंय. दरम्यान या कठीण काळात सलमान खान आणि त्याच्या चाहत्यांच्या भावना शेरा आणि त्याच्या कुटुंबासोबत आहेत. सर्वजण शेराचं सांत्वन करुन त्याला धीर देत आहेत.

टॅग्स :सलमान खानमृत्यूबॉलिवूड