Join us

रेखामुळे मोडलं असतं सख्ख्या बहिणीचं लग्न; एका अटीवर बहिणीला थाटू दिला 'या' अभिनेत्यासोबत संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 19:00 IST

Rekha: रेखामुळे तिच्या सख्ख्या बहिणीचं लग्न रखडलं होतं. त्यामुळे खऱ्या आयुष्यात ती बहिणीसाठी खलनायिका ठरली.

 सदाबहार अभिनयासह सौंदर्यामुळे बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा (rekha). अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या रेखाचं प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चेत राहिलं त्याच्यापेक्षा कैकपटीने तिचं पर्सनल आयुष्य चर्चेत आलं. एकेकाळी त्यांनी बिग बींवर जीवापाड प्रेम केलं. मात्र, त्यांच्यासोबत तिचं कधीच लग्न होऊ शकलं नाही. यामध्येच आता सोशल मीडियावर रेखाच्या बहिणीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. रेखामुळे तिच्या सख्ख्या बहिणीचं लग्न रखडलं होतं. त्यामुळे खऱ्या आयुष्यात त्या बहिणीसाठी खलनायिका ठरल्या.

रेखा यांना सहा सख्ख्या बहिणी असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यातलीच एक बहीण म्हणजे धनलक्ष्मी. रेखाप्रमाणेच धनलक्ष्मी हिलादेखील तिच्या खऱ्या आयुष्यात अनेक चढउतार पाहावे लागले. यात एका ठिकाणी तर रेखाचं त्यांच्यासमोर संकट म्हणून उभी राहिली होती. मात्र, रेखाचा विरोध झुगारुन धनलक्ष्मीने तिला हव्या त्याच अभिनेत्यासोबत लग्न केलं.

'मुलींनी लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवले तर गैर काय? रेखा यांचं बोल्ड वक्तव्य चर्चेत

बॉलिवूड अभिनेता तेज सप्रू यांचं पहिलं लग्न झालेलं असतानाही ते धनलक्ष्मीला डेट करत होते. त्यामुळे त्यांचं हे नातं रेखाला अजिबात मान्य नव्हतं. तेज विवाहित असल्यामुळे आपल्या बहिणीसोबत काही चुकीचं घडू नये ही भीती रेखाला वाटत होती. त्यामुळे तिने या लग्नाला जोरदार विरोध केला होता. परंतु, रेखाच्या आईने धनलक्ष्मी आणि तेज यांच्या नात्याला परवानगी दिली होती. तेज आपले जावई व्हावेत अशी तिच्या आईची इच्छा होती. मात्र, तेज यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे रेखाला हे नातं मान्य नव्हतं. एका मुलाखतीत तेज यांनीही याविषयी भाष्य केलं होतं.

सावळा रंग अन् वाढलेलं वजन; सौंदर्यांची खाण असलेल्या रेखाला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना

धनलक्ष्मीसोबत लग्न करता यावं यासाठी तेजने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि रेखाच्या बहिणीशी संसार थाटला. पहिल्या पत्नीला तेज यांनी घटस्फोट दिल्यानंतर रेखाने धनलक्ष्मीच्या लग्नाला परवानगी दिली. त्यानंतर तेज आणि धनलक्ष्मी यांनी सर्वांच्या परवानगीने१९८७ साली लग्नगाठ बांधली. 

टॅग्स :रेखाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा