Join us

सैफ अली खानच्या घरातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी बांगलादेशी हल्लेखोराला ओळखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:18 IST

Saif Ali Khan Attack Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी सध्या पोलिस तपास सुरू आहे. दरम्यान, सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी बांगलादेशी व्यक्ती शरीफूल फकीर याची ओळख पटवली आहे.

Saif Ali Khan Attack Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी सध्या पोलिस तपास सुरू आहे. दरम्यान, सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी बांगलादेशी व्यक्ती शरीफूल फकीर याची ओळख पटवली आहे. तसेच त्या दिवशी सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर हाच असल्याचे आपल्या जबाबात सांगितले आहे. या संदर्भातील माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली आहे.

३० वर्षीय शरीफूल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास याला मागच्या महिन्यात अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सध्या शरीफूल इस्लाम उर्फ विजय दास हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं आहे.

मुंबई पोलिसांमधील एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी बुधवारी आर्थर रोड कारागृहामध्ये ओळख परेड घेतली. यावेळी सैफअली खानच्या घरातील कर्मचारी एलियाम्मा फिलिप (५६) आणि कौटुंबिक सहाय्यक जुनू यांनी शरीफूल याची ओळख सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराच्या रूपात पटवली आहे. 

टॅग्स :सैफ अली खान गुन्हेगारीमुंबई पोलीसबॉलिवूडमुंबई