Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ-करिश्मा कपूरचा सुपरहिट सिनेमा, त्यावेळी किती वर्षांची होती करीना? २७ वर्षांपूर्वी झालेला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:31 IST

सैफ-करीनाच्या वयात किती आहे अंतर?

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर ही स्टायलिश जोडी कायम चर्चेत असते. दोघंही एकदम रॉयल अंदाजात दिसतात. सैफ-करीनाने २०१२ साली त्यांनी लग्न केलं. त्यांना तैमूर आणि जेह ही गोंडस मुलंही आहेत. करीना सैफपेक्षा १० वर्षांनी लहान आहे. सैफने करीनाची मोठी बहीण करिश्मा कपूरसोबत अनेक सिनेमे केले. सैफ-करिश्माच्या एका सुपरहिट सिनेमावेळी करीना अगदीच लहान होती. कोणता होता तो सिनेमा?

९० च्या दशकात आलेला 'हम साथ साथ है' या मल्टीस्टारर सिनेमाची जादू आजही कायम आहे. अजूनही हा सिनेमा काही चाहते बघत असतात. या सिनेमातली सैफ-करिश्माची जोडी सगळ्यांना आवडते. त्यांची हलकू फुलकी, विनोदी आणि रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. हा सिनेमा १९९९ साली रिलीज झाला.  त्यावेळी करीना कपूर फक्त १९ वर्षांची होती. ती तेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याची तयारी करत होती. लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे २००० साली करीनाने 'रेफ्युजी' सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण केलं. यामध्ये ती अभिषेक बच्चनसोबत झळकली. त्याचाही हा पहिलाच सिनेमा होता.

गेल्या काही वर्षात सैफ-करीनानेही एकत्र सिनेमांमध्ये काम केलं. 'टशन','एजंट विनोद','कुर्बान','ओमकारा' या सिनेमांमध्येही ही जोडी दिसली. २००८ साली आलेल्या 'टशन' सिनेमाच्या सेटवरच दोघं प्रेमात पडले. काही वर्ष डेट केल्यानंतर २०१२ साली त्यांनी लग्न केलं. सैफ अली खानचं हे दुसरं लग्न होतं. याआधी सैफने वयाच्या २१ व्या वर्षीच अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्नगाठ बांधली होती. सैफ अमृताहून १३ वर्षांनी लहान होता. लग्नाच्या वेळी अमृता ३४ वर्षांची होती. त्यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं झाली. मात्र काही वर्षांनी त्यांच्यात मतभेद झाले आणि २००४ साली त्यांचा घटस्फोट झाला. 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान बॉलिवूडकरिश्मा कपूर