Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' घटनेनंतर साई पल्लवीने बोल्ड कपडे घालणंच सोडलं; म्हणाली, "मला खूप वाईट वाटलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:29 IST

साई पल्लवी मेकअप न करताच सिनेमाचं शूट करते हे सर्वांना माहित आहे. पण ती बोल्ड कपडेही का घालत नाही माहितीये का?

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने मनोरंजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे तर सगळेच चाहते आहेत. शिवाय साई पल्लवी ही स्क्रीनवर विना मेकअप काम करते हे तिचं वैशिष्ट्य आहे. इतकंच नाही तर ती सिनेमांमध्ये फारसे बोल्ड कपडेही परिधान करत नाही. असं का? यामागचं कारण तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

साई पल्लवी एका मुलाखतीत म्हणाली, "मी कॉलेजमध्ये असताना डान्स स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी मी हाय स्लिट ड्रेस घातला होता. त्यात माझा थोडा बोल्ड लूक होता. तो टँगो डान्स होता आणि मी त्यासाठी खूप मेहनत घेतली होती. मात्र व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल झाला आणि लोक त्यात माझा डान्स नाही तर माझ्या कपड्यांकडेच पाहत होते. त्यावर कमेंट करत होते. परफॉर्मन्स सोडून लोक माझ्या शरिरावर फोकस करत होते."

ती पुढे म्हणाली, "मला ते पाहून खूप वाईट वाटलं होतं. मला असं वाटलं की लोक मला एक ऑब्जेक्ट म्हणून पाहत आहेत. या घटनेने माझ्यावर वाईट परिणाम झाला होता. यामुळेच मी नंतर बोल्ड कपडे घालणंच सोडून दिलं. लोकांनी मला माझ्या ग्लॅमरसाठी नाही तर टॅलेंट पाहून ओळखावं. मी जशी आहे तसंच लोकांनी पाहावं असं मला वाटतं. अगदी साधेपणाच्या भावनेतून हे असावं. लोकांनी माझ्या भूमिका, अभिनय लक्षात ठेवावा ना की मी कशी दिसते हे बघावं."साई पल्लवी आगामी 'एक दिन'  या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मे महिन्यात हा सिनेमा येत आहे. यामध्ये तिची जोडी आमिर खानचा लेक जुनैद खानसोबत जमली आहे. तसंच ती रणबीर कपूरसोबत बहुप्रतिक्षित 'रामायण' सिनेमातही दिसणार आहे. यात ती माता सीतेच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sai Pallavi stopped wearing bold clothes after dance video backlash.

Web Summary : Sai Pallavi revealed she stopped wearing bold clothes after a dance video went viral, attracting unwanted attention to her attire rather than her talent. This experience made her uncomfortable and influenced her to prioritize recognition for her acting skills over her appearance. She will debut in Bollywood soon.
टॅग्स :साई पल्लवीबॉलिवूडTollywood