Join us

हृतिकच्या गर्लफ्रेंडने व्हायरल व्हिडिओवर दिलं उत्तर, म्हणाली, 'मी वेडी असायलाच पाहिजे तेव्हाच...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 14:00 IST

सबा आजादचा रॅम्पवर विचित्र नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची (Hritik Roshan) गर्लफ्रेंड सबा आजाद (Saba Azad) बद्दल ऐकलं असेलच. हृतिकची गर्लफ्रेंड अशीच तिची ओळख बनली आहे. नुकताच तिचा लॅक्मे फॅशन वीक मध्ये रॅम्पवर विचित्र डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर तिला बरंच ट्रोल करण्यात आलं. हिच्या अंगात आलंय का, हा ड्रग्सचा परिणाम आहे असेही आरोप तिच्यावर करण्यात आले. या ट्रोलिंगवर आता सबाने उत्तर दिलं आहे.

सबाच्या व्हायरल डान्स व्हिडिओवर एकाने प्रतिक्रिया देत लिहिले, 'तुला थेरेपीची गरज आहे.' त्या युझरला सबा म्हणाली,'हो का सर/मॅडम, मी सहमत आहे आणि मी याकडे खूपच नॉर्मली बघते. या तिरस्काराने भरलेल्या जगात प्रत्येकानेच हे केलं पाहिजे. तुम्हीही करुन बघितलं पाहिजे. तुमच्या जखमा भरुन काढण्यासाठी याची मदतच होते. तसंच दुसऱ्यांचं शांततापूर्ण आयुष्य बघून तुम्हाला फरक पडणार नाही.'

तसंच जाफर नावाच्या व्यक्तीने तिला 'तू पागल आहे का?' असे विचारले. त्याला ती म्हणाली,'हो जाफर, मी पागल असायलाच पाहिजे रोज सकाळी उठल्यावर माझ्या मार्गात जो तिरस्कार येत आहे  आणि आजचा दिवस चांगला असेल असा मी विचार करण्याचा प्रयत्न करते. मी खरंच वेडी असेन कारण हे जग तुझ्यासारख्या लोकांनी भरलेलं आहे जे स्क्रीनमागे लपून जगात तिरस्कार पसरवण्याशिवाय दुसरं काही करत नाहीत, हाच वारसा तुम्ही चालवत आहात.'

कालपासून सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला सबाने रोखठोक शब्दात उत्तर दिलं आहे. सबा हृतिक रोशनपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. दोघंही एकमेकांच्या प्रेमात असून हातात हात घालून बाहेर डेटवर जाताना दिसतात. सबा नुकतीच 'हू इज युअर गायनॅक' या सिरीजमध्ये काम केले. तिचा स्वत:चा म्युझिक बँडही आहे.

टॅग्स :हृतिक रोशननृत्यसोशल मीडियाट्रोलरिलेशनशिप