Join us

'गोलमाल 5' बद्दल रोहित शेट्टीनं दिले मोठे अपडेट; जाणून घ्या कधी रिलीज होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 15:25 IST

आतापर्यंत 'गोलमाल' चे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

'गोलमाल' चित्रपटाच्या सीरिजने चाहत्यांचे प्रचंड  मनोरंजन केलं. आतापर्यंत 'गोलमाल' चे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 'गोलमाल' सीरीजचे चारही सिनेमे हिट ठरले. त्यामुळे या सीरीजचा पाचवा सिनेमा 'गोलमाल 5' आणण्याचा निर्णय रोहित शेट्टीने घेतला आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये  रोहित शेट्टीने हे अपडेट दिलं आहे. 

'पिंकविला'शी बोलताना रोहित शेट्टी म्हणाला, 'गोलमाल 5' नक्कीच बनणार आहे. मला वाटतं पुढच्या 2 वर्षात तुम्हाला 'गोलमाल 5' पाहायला मिळेल. सिनेमातील अलीकडील बदल लक्षात घेता गोलमाल फ्रँचायझीचा हा आगामी चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा अधिक भव्य असेल. 

पुढे तो म्हणाला, 'मी गोलमाल या कॉमेडी चित्रपटात अ‍ॅक्शन जोडू शकत नाही, पण मी त्याच्या स्टाइलची पातळी वाढवू शकतो. 'गोलमाल'चा मोठा चाहतावर्ग आहे. खास या चाहत्यांसाठी मी हा सिनेमा बनवत आहे. 'गोलमाल 5' हा विनोदीपट असला तरी भव्यदिव्य असायला हवा'.

'गोलमाल फन अनलिमिटेड', 'गोलमाल रिटर्न्स', 'गोलमाल 3' आणि 'गोलमाल अगेन' हे आजही चाहत्यांच्या आवडत्या चित्रपटांमध्ये आहेत.  तर लवकरच 'गोलमाल 5' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे अ‍ॅक्शन, रोमान्स, कॉमेडी आणि कम्प्लिट मनोरंजन. आता 'गोलमाल 5' मध्ये काय नवे असणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :रोहित शेट्टीसेलिब्रिटीबॉलिवूडअजय देवगणसिनेमा