Golmaal 5 Update:बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. त्यातीलच एक नाव म्हणजे गोलमाल. या चित्रपटाच्या पहिल्या चार भाग यशस्वी झाल्यानंतर पाचव्या पार्टबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. त्यात आता मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे सिनेरसिक मोठ्या आतुरतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत.
दरम्यान, पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'गोलमाल ५' च्या कथेवर काम सुरू आहे आणि सप्टेंबर २०२५ पर्यंत चित्रपटाचं स्क्रिप्ट तयार होण्याची शक्यता आहे. तसंच चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर, गोलमाल फ्रँचायझीच्या या भागात, अजय देवगणसह, अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे आणि जॉनी लिव्हर सारखे कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. हा चित्रपट २०२६ पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टी सध्या त्याचा आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. राकेश मारिया यांच्या बायोपिकवक आधारित या सिनेमात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहे. या प्रोजेक्टनंतर रोहित शेट्टीअजय देवगणसोबत 'गोलमाल-५' शूटिंगला सुरुवात करणार, असल्याचं म्हटलं जात आहे.
रोहित शेट्टी आणि अजय देवगण ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील हिट जोडी मानली जाते. आजपर्यंत बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी एकत्र काम केलं आहे.या जोडीने गोलमाल, संडे, ऑल द बेस्ट, सिंघम, बोल बच्चन, सिंघम रिटर्न्स, सिम्बा आणि सूर्यवंशी सारख्या अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यात आता ते दोघे 'गोलमाल-५' च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवायला येणार आहेत.