Join us

Priyanka Chopra: प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या नात्यात दुरावा? लग्न मोडण्याच्या मार्गावर, प्रियंकाने उचललं मोठं पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 23:31 IST

Priyanka Chopra and Nick Jonas: आता निक जोनास आणि प्रियंका चोप्रा यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच दोघांमधील संबंध बिघडल्याने प्रियंकाने एक मोठे पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.

नवी दिल्ली - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. मात्र यावेळी प्रियंका तिच्या विवाहावरून खूप चर्चेत आहे. प्रियंकाने २०१८ मध्ये अमेरिकन पॉपस्टार निक जोनास याच्यासोबत विवाह केला होता. तेव्हापासूनच प्रियंका आणि निक प्रसिद्ध जोडप्यांमध्ये चर्चिले जात होते. मात्र आता निक जोनास आणि प्रियंका चोप्रा यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच दोघांमधील संबंध बिघडल्याने प्रियंकाने एक मोठे पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.

प्रियंका चोप्रा हिने निक जोनाससोबवत विवाह केल्यावर आपले नाव प्रियंका चोप्रा जोनास असे बदलले होते. मात्र हल्लीच प्रियंकाने सोशल मीडियावरील आपले नाव पुन्हा बदलताना त्यामधून पती निक जोनासचे आडनाव काढून टाकले आहे. त्यावरून निक जोनास आणि प्रियंका चोप्रा यांच्यातील नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा रंगली आहे. तसेच हे दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत, असे लोकांना वाटत आहे.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनासची जोडी चाहत्यांमध्ये खूप पसंत केली जाते. मात्र प्रियंकाने उचललेल्या या पावलामुळे चाहत्यांना धक्का लागण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच तिने तिच्या नावामधून जोनास हे आडनाव का काढले, याबाबतही माहिती दिलेली नाही. मात्र तिने उचललेल्या या पावलानंतर दोघांमधील संबंध बिघडल्याची चर्चा मात्र जोरात आहे. 

मात्र काही माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा यांनी या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रियंका आणि निकच्या नात्यात दुरावा आल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच हे वृत्त अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा प्रकारची अफवा न पसरवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.  

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासरिलेशनशिपबॉलिवूड