Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिचा चड्डाने घेतला कंगना राणौतसोबत 'पंगा', वाचा काय आहे त्यामागील कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 16:40 IST

रिचा चड्डा सध्या आपला आगामी सिनेमा लव्ह सोनियाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकताच तिने कंगना राणौतशी पंगा घेतला आहे.

ठळक मुद्देपंगा सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे

रिचा चड्डा सध्या आपला आगामी सिनेमा लव्ह सोनियाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.  नुकताच तिने कंगना राणौतशी पंगा घेतला आहे.  होय, तुम्ही बरोबर वाचलात रिचा अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित पंगा सिनेमात दिसणार आहे. आतापर्यंत कंगना राणौत, जस्सी गिल, पंकज त्रिपाठी आणि नीना गुप्ता यांचे नाव फायनल करण्यात आले होते आता या टीममध्ये रिचाचे नावदेखील सामील झाले आहे. 

 

पंगा सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे. पहिल्यांदाच कंगना, रिजा, जस्सी आणि नीना गुप्ता एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. अश्विनीने याआधी बरेली की बर्फी आणि नील बटे सन्नाटासारखे सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. 

कंगनाचा मणिकर्णिकाच्या दिग्दर्शकासोबत झालेला वाद लक्षात घेता अश्विनी अय्यरने कंगनाकडून एक करार साईन करून घेतला आहे. हा करार म्हणजे ‘no interference contract’. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना व अश्विनीत अनेक बैठका झाल्यात. कंगना या सिनेमातील भूमिकेला पूरेपूर न्याय देईल, असा विश्वास अश्विनीला आहे. पण दिग्दर्शकाच्या कामात कंगनाची ढवळाढवळ तिला मान्य नाही. ‘पंगा’मध्ये कंगना राणौत एका कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 'कबड्डी' खेळावर आधारित आहे. यात कंगना कबड्डी खेळाडूची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंगना यात कॉलेजच्या मुलीपासून ते विवाहीत स्त्री आणि नंतर आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. जर ही माहिती खरी ठरली तर कंगना पहिल्यांदा स्क्रिनवर आईची भूमिका साकारताना दिसेल. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

टॅग्स :कंगना राणौतरिचा चड्डा