Join us

रवीना टंडन मुंबईतील मेट्रो स्टेशनवर स्पॉट; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 15:37 IST

रवीना टंडन मुंबई मेट्रो स्टेशनवर स्पॉट झाली.

90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री रवीना टंडनवर आजही लाखो चाहते फिदा होतात. सध्या ती  'कर्मा कॉलिंग' (Karma Calling) या वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. अशातच रवीना टंडन आता मुंबई मेट्रो स्टेशनवर दिसून आली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रवीना टंडन मुंबई मेट्रो स्टेशनवर स्पॉट झाली.  तिचा मेट्रो स्टेशनवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ' प्रवाशांना त्रास नाही झाला पाहिजे', असे म्हणताना ती दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले होते. काही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं. तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं. आलिशान वाहनांमध्ये प्रवास करणारे स्टार्स सार्वजनिक वाहनातून प्रवास केल्याने कायमच चर्चेत येत असतात. याआधीही अक्षय कुमार, हृतिक रोशन हे मेट्रोने प्रवास करताना दिसून आले आहेत. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तिनं ओटीटीवर पदार्पण केलंय.  'कर्मा कॉलिंग' (Karma Calling) या वेबसीरिजमध्ये रवीना इंद्राणी कोठारी या पॉवरफुल महिलेच्या भूमिकेत आहे. ९० च्या दशकातील बॉलिवूडची क्वीन आणि आता अलिबागची 'राजमाता' अशी तिच्या भूमिकेची ओळख करुन दिली आहे. सीरिजमध्ये हत्या, रोमान्स, सस्पेन्स, थ्रील असं सर्वच आहे. हॉटस्टारवर ही सीरिज चाहते पाहू शकतात. 

टॅग्स :रवीना टंडनसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया