Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर' पाहून रवीना टंडनने मागितली यामी गौतमची माफी; म्हणाली- "मी तुझ्या पतीची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:06 IST

रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने थेट आदित्य धरची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतमला फोन केला. फोन करुन रवीनाने यामीला चक्क 'सॉरी' म्हटले. काय आहे यामागचं कारण?

चित्रपट दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने थेट आदित्य धरची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतमला फोन केला. फोन करुन रवीनाने यामीला चक्क 'सॉरी' म्हटले. काय आहे यामागचं कारण?

 रवीना टंडनने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये या मजेशीर प्रसंगाचा खुलासा केला. रवीना म्हणाली की, चित्रपट पाहिल्यानंतर ती आदित्य धरच्या दिग्दर्शनाच्या इतकी प्रेमात पडली की तिने लगेच आदित्यची पत्नी यामी गौतमला फोन लावला. फोन लावून म्हणाली, "मला माफ कर, सॉरी! पण मी तुझ्या पतीची (आदित्य धर) सर्वात मोठी फॅन झाली आहे. आता तुला माझंही लक्ष तुझ्या पतीकडे वळवावं लागेल.", असं रवीना शेवटी गंमतीत म्हणाली.

भारतीय सिनेमाला मिळाला खरा 'हिरो'

रवीनाने 'धुरंधर' चित्रपटाचे कौतुक करताना सांगितले की, "पुष्पा, केजीएफ आणि आता धुरंधर सारखे चित्रपट पाहून प्रेक्षकांना समाधान मिळाले आहे. बऱ्याच काळानंतर पडद्यावर 'हिरो' हा हिरोसारखा दिसत आहे. आपल्या देशातील समस्या सोडवण्यासाठी जो धावून येतो, तो खरा नायक आहे. आदित्य धर हे केवळ प्रतिभाशाली दिग्दर्शक नाहीत, तर त्याहूनही पलीकडचे आहेत."

रवीनाने यावेळी रणवीर सिंगच्या कामाचंही भरभरून कौतुक केले. तिने सांगितले की, रणवीर हा तिचा खूप मोठा चाहता आहे आणि तो जेव्हा १० वर्षांचा होता, तेव्हापासून तो तिला फॉलो करत आहे. या चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, सारा अर्जुन आणि इतर सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट काम केले असल्याचे रवीनाने नमूद केले.

'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर धमाका

५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर'ने जगभरात १३०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करून इतिहास रचला आहे. भारतात या चित्रपटाने ८०० कोटींचा आकडा पार केला असून, कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी ही आतापर्यंतची सर्वोच्च कमाई ठरली आहे. कराचीतील दहशतवादी कारवाया आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या मिशनवर आधारित असलेल्या या चित्रपटाचा सिक्वेल 'धुरंधर: द रिव्हेंज' १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या 'धुरंधर'चा पहिला भाग तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Raveena Tandon Apologizes to Yami Gautam After Watching 'Dhurandhar'

Web Summary : Raveena Tandon, impressed by Aditya Dhar's 'Dhurandhar', playfully apologized to his wife Yami Gautam, jokingly declaring herself a huge fan. She lauded the film for its portrayal of a true hero and praised the performances of Ranveer Singh and the entire cast. The film has grossed over ₹1300 crore worldwide.
टॅग्स :रवीना टंडनयामी गौतमबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकारधुरंधर सिनेमा