Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सामी सामी' वर डान्स करायला 'श्रीवल्ली'चा नकार, म्हणाली, 'मला नंतर पाठदुखीचा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 12:42 IST

रश्मिकाने 'सामी सामी' वर कधीच नाचणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. काय आहे यामागचं नेमकं कारण?

नॅशनल क्रश 'श्रीवल्ली' म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नेहमी तिच्या अदांमुळे चर्चेत असते. तिचं हसणं, बोलणं चाहत्यांना भुरळ पाडतं. 'पुष्पा' सिनेमात ती अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) झळकली आणि श्रीवल्ली म्हणून लोकप्रिय झाली. या सिनेमातील तिचं 'सामी सामी' (Sami Sami) हे गाणंही प्रचंड गाजलं. रश्मिका जिथे जाईल तिथे तिला या गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह केला जातो. मात्र आता रश्मिकाने 'सामी सामी' वर कधीच नाचणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. काय आहे यामागचं नेमकं कारण?

'पुष्पा' सिनेमातील 'सामी सामी' हे गाणं ऐकलं की लगेच रश्मिकाची डान्स स्टेप डोळ्यासमोर येते. कंबर हलवत केलेला तिचा हा डान्स प्रचंड लोकप्रिय झाला. अगदी लहान मुलींपासून मोठ्यांनी सुद्धा या गाण्यावर ठेका धरला.  मात्र आता 'सामी सामी'वर नाचणार नाही असं रश्मिकाने ट्वीट करतच सांगितलं आहे. 

रश्मिकाच्या एका चाहत्याने ट्वीट केले, 'मला तुमच्यासोबत सामी सामी वर नाचायचं आहे. नाचू शकतो का ?'

या ट्वीटवर रश्मिका रिप्लाय देत म्हणाली, 'मी सामी सामी ची स्टेप आता खूप वेळा केली आहे. वय वाढलं की मला पाठीचं दुखणं सुरु होईल असं मला वाटतंय. असं नका रे करु माझ्यासोबत. आपण भेटल्यावर काहीतरी वेगळं करु.'

रश्मिकाने 'गुडबाय' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती 'पुष्पा २' मध्येही दिसणार आहे. ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवशीच 'पुष्पा २' चा टीझर प्रदर्शित होणार आहे ज्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. हा ३ मिनिटांचा मोठा टीझर असणार आहे. अल्लु अर्जुन जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. याशिवाय रश्मिका 'अॅनिमल'या सिनेमात रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानानृत्यट्विटरसोशल मीडिया