'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) पुन्हा 'श्रीवल्ली' च्या भूमिकेत जादू केली. 'पुष्पा २' मध्ये रश्मिकाच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. रश्मिका लवकरच सलमान खानसोबत 'सिकंदर' मध्ये झळकणार आहे. सिनेमाचं शूट जोरात सुरु आहे. दरम्यान रश्मिका जिममध्ये जखमी झाली असून सिनेमाचं शूट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रश्मिकाला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे तिचे चाहते चिंतेत पडलेत.
'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाला नुकतंच जिममध्ये दुखापत झाली. फार गंभीर दुखापत नसून तिला केवळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ती लवकराच लकरच बरी होईल अशी माहिती आहे. मात्र यामुळे तिच्या काही प्रोजेक्ट्सचं शूट थांबलं आहे. यामध्ये सलमानच्या 'सिकंदर' सिनेमाचं शूटही पुढे ढकलण्यात आलं आहे. रश्मिका लवकरच बरी होऊन सेटवर येईल तेव्हा शूट पुन्हा सुरु होणार आहे.
मिड डे रिपोर्टनुसार, सलमान खान आणि रश्मिका १० जानेवारीला 'सिकंदर' च्या शेवटच्या शेड्युलचे चित्रीकरण करणार होते. मात्र आता शेड्युल पुढे ढकलण्यात आले आहे. 'सिकंदर' पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. सिनेमाचं टीझर सलमानच्या वाढदिवसालाच समोर आलं. प्रेक्षक सिनेमा पाहण्यास आतुर आहेत. यामध्ये सलमान खान, रश्मिका मंदानाशिवाय काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर, सत्यराज यांचीही भूमिका आहे. ए आर मुरुगदास यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.