Badshah Second Wedding: बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशहा (Badshah) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बादशहा आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी (Isha Rikhi) यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, आता या दोघांनी गुपचुप लग्न केल्याची चर्चा आहे. ईशा रिखीच्या आईने सोशल मीडियावर लग्नाचे काही 'इनसाइड' फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज २४ मार्च २०२६ रोजी ईशाची आई पूनम रिखी यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर लग्नाचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये बादशहा आणि ईशा हे नवविवाहीत दाम्पत्य दिसत असून त्यांनी पारंपरिक पोशाख परिधान केला आहे. या दोघांनी गुपचुप लग्न केल्याची चर्चा आहे. कारण एका व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांना वरमाला घालताना आणि सात फेरे घेताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या आईने या व्हिडीओखाली 'देवाचा तुमच्यावर आशीर्वाद राहो!' अशी कमेंट केल्याने या दोघांनी खरंच लग्न केलं असल्याच्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे.
कोण आहे ईशा रिखी? (Who is Isha Rikhi?)
बादशहा आणि ईशा रिखी गेल्या ४ ते ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. २०१२ मध्ये बादशहाने जस्मिन मसिहसोबत पहिले लग्न केले होते, त्यांना २०१७ मध्ये एक मुलगीही झाली. मात्र, २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर बादशहाने ईशासोबतच्या नात्यावर कधीही उघडपणे भाष्य केले नव्हते. अगदी गेल्या वर्षी लग्नाच्या चर्चा रंगल्या तेव्हा बादशहाने त्या केवळ 'अफवा' असल्याचे म्हटले होते. ईशा रेखी ही पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल असून तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलंय.
मात्र, आता थेट बादशहाच्या सासूबाईंनीच कमेंट केल्याने दोघांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अजूनतरी बादशहा किंवा ईशा यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या लग्नासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नाहीये, तरीही सोशल मीडियावर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
Web Summary : Rapper Badshah is rumored to have secretly married Punjabi actress Isha Rikhi. Photos and videos shared by Isha's mother suggest a traditional wedding. Badshah previously denied rumors of their relationship after divorcing his first wife in 2020.
Web Summary : रैपर बादशाह ने कथित तौर पर पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी से गुपचुप शादी कर ली। ईशा की मां द्वारा साझा किए गए फोटो और वीडियो पारंपरिक शादी का संकेत देते हैं। बादशाह ने 2020 में अपनी पहली पत्नी से तलाक के बाद उनके रिश्ते की अफवाहों का खंडन किया था।