Join us

रणवीर आणि दीपिका पादुकोण बाळाचे नाव काय ठेवणार? अभिनेत्याचा जुना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 13:36 IST

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बाळाचे नाव काय ठेवणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी अखेर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दोघेही लवकरच आई-बाबा होणार आहेत.  या दोघांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. या खुशखबरीनंतर लगेचच  सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बाळाचे नाव काय ठेवणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे. यातच रणवीरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रणवीर सिंहचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रणवीर हा त्याच्या बाळाच्या नावाबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर म्हणतो, 'तुम्हा सर्वांना माहीत आहे की मी विवाहित आहे आणि मला काही वर्षात मूल होईल. भावा, तुझी वहिनी (दीपिका) लहानपणी खूपच क्युट दिसायची. मी तिला नेहमी म्हणतो की, तू मला अशी एक मुलगी दे म्हणजे माझं आयुष्य सेट होईल. मी मुलांची नावं देखील शॉर्टलिस्ट करत आहे'.

रणवीर कार्यक्रमात आलेल्या शौर्यवीर नावाच्या स्पर्धकाला म्हणतो, "तुझी हरकत नसेल तर मी माझ्या बाळाला शौर्यवीर हे नावं देऊ शकतो?" यानंतर रणवीर आपल्या स्टाईलमध्ये "शौर्यवीर सिंह", असं म्हणतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. आता जर दीपवीरला मुलगा झाला तर  त्याचं नाव 'शौर्यवीर' असं ठेवणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दीपवीरने सोशल मीडियावर गुडन्यूज शेअर करत लिहिले,  "सप्टेंबर 2024". याचा अर्थ दीपिका आणि रणवीर यांच्या घरी सप्टेंबर महिन्यामध्ये बाळाचं आगमन होणार आहे. तिनं ही पोस्ट शेअर करताच काही मिनिटांमध्येच लाखो लोकांनी या पोस्टला लाइक केले असून त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगनं 2018 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या पाच वर्षानंतर ते आई-वडील होणार आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, 'सिंघम अगेन' या चित्रपटातून दीपिका आणि रणवीर हे दोघे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोणसेलिब्रिटीबॉलिवूड