Dhurandhar 2 Movie: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंह सध्या धुरंधर-२ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.या ब्लॉकबस्टर चित्रपटाने अनेक सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाला सगळ्याच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून, त्यातील प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक पात्राबद्दल चर्चा होत आहे. शिवाय क्लायमॅक्सबद्दलही तितकीच चर्चा होताना दिसतेय. मात्र, यासाठी कलाकारांनीही तितकीच मेहनत केली आहे.
अलिकडेच चित्रपटाचे मेकअप आणि प्रोस्थेटिक आर्टिस्ट करनदीप सिंग यांनी धुरंधर-२ च्या क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगचे किस्से शेअर केले. अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट बनवण्यात आला. करनदीप सिंग यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगला रिहर्सलसह १५ ते २० दिवसांचा कालावधी लागला होता. धुरंधर २ चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगसाठी अभिनेता रणवीर सिंगने ४७-४८ अंश सेल्सिअस तापमानात लेदर जॅकेट आणि विग घालून शूटिंग केली होती.
पुढे ते म्हणाले,"शूटिंग लुधियानाच्या बाहेरील भागात झाली, जिथे तापमान ४७-४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. आजूबाजूला कोणतीही सावली किंवा झाडे नव्हती, ज्यामुळे परिस्थिती आणखी आव्हानात्मक बनली होती. सेटच्या आजूबाजूला धातूचे कंटेनर, गाड्या आणि उभ्या मालगाड्या होत्या, ज्यातून सतत उष्णता बाहेर पडत होती. टीमला याच परिस्थितीत शूटिंग करावी लागली.
अशा परिस्थितीत रणवीरने केलेलं शूटिंग...
या मुलाखतीमध्ये करनदीपने सांगितलं की," रणवीरने यावेळी जड पठाणी सूट, लेदर जॅकेट आणि ओव्हरकोट घालून अॅक्शन सीन केले. एका सीनमध्ये त्याला जळत्या कंटेनर्सवर उडी मारायची होती, जे उष्णतेमुळे खूप तापले होते. शूटिंगदरम्यान एका आठवड्यात एक बादली रक्त (प्रॉप्स) वापरले गेले. अत्यंत उष्णता असूनही रणवीर सिंग संपूर्ण वेळ शांत राहिला आणि त्याने शूटिंग पूर्ण केलं."
Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' success stems from challenging shoot. Actors endured 48°C heat, burning containers. Singh shot action scenes in heavy attire, showcasing dedication and resilience despite the extreme heat.
Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर 2' की सफलता चुनौतीपूर्ण शूटिंग का परिणाम है। कलाकारों ने 48 डिग्री सेल्सियस गर्मी और जलते कंटेनरों को सहा। सिंह ने भारी पोशाक में एक्शन सीन शूट किए, जो अत्यधिक गर्मी के बावजूद समर्पण और लचीलापन दिखाते हैं।