Join us
Daily Top 2Weekly Top 5

"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 09:50 IST

लेक दुआबद्दलही रणवीर म्हणाला...

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणबॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील कपल. दोघंही आपापल्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहेत. तसंच वैयक्तिक आयुष्यातही एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले आहेत. दिवाळीच्या मुहुर्तावर रणवीर आणि दीपिकाने लेक दुआचा चेहरा पहिल्यांदाच सोशल मीडियावर चाहत्यांना दाखवला. त्या फोटोला लाखो लाईक्स मिळाले होते. रणवीर दीपिकाची लव्हस्टोरी 'रामलीला'च्या सेटवर सुरु झाली होती. नुकतंच रणवीरने आपल्या लव्हस्टोरीच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच लेक दुआबद्दलही प्रतिक्रिया दिली.

रणवीर सिंहने नुकतंच उदयपूरमध्ये झालेल्या एका ग्रँड वेडिंगमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याला त्याची दीपिकासोबतची लव्हस्टोरी आठवली. तो म्हणाला, "ही जागा खूपच खास आहे. अनेक प्रेमकहाण्यांसाठी उदयरपूर शहर हे खरोखर लकी चार्म आहे. मी इथे रामलीला सिनेमा शूट केला होता, तुम्ही पाहिलात का? तुमच्या वहिनीसोबत मी स्क्रीन शेअर केली होती. रामलीलाचं सर्वात लांब उदयपूर शेड्युल सुरु होतं. तेव्हाच आम्ही प्रेमकहाणी फुलली. तेव्हापासून आजपर्यंत १३ वर्ष झाली आम्ही एकत्र आहोत. लग्नाला ७ वर्ष झाली आहेत आणि एक सुंदर मुलगी आहे. त्यामुळे बघा, उदयपूर लव्हस्टोरीजसाठी किती लकी आहे."

रणवीरच्या या व्हिडीओवर समोर असलेल्या प्रेक्षकांनी जोरजोरात शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट केला.  दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या प्रेमकहाणीला २०१३-१४ साली सुरुवात झाली होती. सहा वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर २०१८ मध्ये त्यांनी इटली येथे लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सात वर्षांनी त्यांना मुलगी झाली. लेकीच्या जन्मानंतर दीपिका पुन्हा सिनेमात कमबॅक करणार आहे. तर रणवीर सिंह सध्या आगामी 'धुरंधर' सिनेमामुळे चर्चेत आहे. ५ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Singh Reminisces: Udaipur is where our love story began.

Web Summary : Ranveer Singh fondly recalled meeting Deepika in Udaipur during 'Ram Leela' filming. Their love blossomed there, leading to marriage and parenthood. He shared this at a wedding, highlighting Udaipur's special place in their love story.
टॅग्स :रणवीर सिंगबॉलिवूडदीपिका पादुकोणदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट