बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रणवीर सिंगविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रणवीरच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या.
एका सार्वजनिक कार्यक्रमात 'कांतारा' चित्रपटातील 'दैवा'ची नक्कल केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात बंगळुरूमध्ये एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे दक्षिण भारतात, विशेषतः कर्नाटकच्या तुलुनाडू भागात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एका इव्हेंटमध्ये रणवीर सिंगने 'कांतारा' चित्रपटातील प्रसिद्ध 'वराह रूपम' आणि 'गुलीगा दैवा'च्या ओरडण्याची नक्कल केली होती. ही नक्कल करताना त्याने स्थानिक श्रद्धेचा अपमान केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. सर्वात महत्त्वाचा आक्षेप हा आहे की, रणवीरने 'चामुंडी दैवा'चा उल्लेख 'स्त्री भूत' असा केला. तुलुनाडू संस्कृतीमध्ये ही दैवते अत्यंत पवित्र मानली जातात आणि त्यांची तुलना भुताशी करणे हा धार्मिक भावनांचा अपमान असल्याचे मानले जाते.
बंगळुरूच्या एका स्थानिक पोलीस ठाण्यात एका सामाजिक कार्यकर्त्याने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत असे म्हटले आहे की, "रणवीर सिंगने आपल्या कृत्याने कोट्यावधी लोकांच्या श्रद्धा असलेल्या दैवतांची थट्टा उडवली आहे. दैवतांना 'भूत' संबोधणे हे अज्ञानाचे लक्षण असून यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत." याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या वादावर रणवीर सिंग किंवा त्याच्या टीमकडून अजूनही कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. गोव्यातील IFFI महोत्सवात रणवीरने ही नक्कल केली होती.
Web Summary : Ranveer Singh faces FIR in Bengaluru for allegedly mocking deities from 'Kantara' at an event. He is accused of insulting local beliefs by referring to deities as ghosts, sparking outrage and accusations of hurting religious sentiments. Police have registered a case; Singh's team is yet to respond.
Web Summary : रणवीर सिंह 'कांतारा' के देवताओं का कथित तौर पर मजाक उड़ाने के मामले में बेंगलुरु में एफआईआर का सामना कर रहे हैं। उन पर स्थानीय मान्यताओं का अपमान करने और धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने का आरोप है। पुलिस ने मामला दर्ज किया; सिंह की टीम की प्रतिक्रिया आनी बाकी है।