Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर २'मध्ये मोठे सरप्राईज! यामी गौतमचा खुलासा; विकी कौशलचा कॅमियो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:27 IST

'धुरंधर २' मध्ये 'कॅमिओ'ची मोठी फौज! यामी गौतमने उघड केलं मोठं गुपित

आदित्य धर दिग्दर्शित आणि अभिनेता रणवीर सिंगचा 'धुरंधर २ : द रिव्हेंज' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट मानला जात आहे. हा चित्रपट मागील वर्षी ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या सिनेमाचा दुसरा भाग आहे. पहिला भाग  'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. त्यामुळे दुसरा भाग 'धुरंधर २ : द रिव्हेंज'कडूनही प्रेक्षकांना मोठी अपेक्षा आहे.  आाता 'धुरंधर २ : द रिव्हेंज'विषयी अभिनेत्री यामी गौतम हिने एक महत्त्वाचं अपडेट शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

दिग्दर्शक आदित्य धर यांची पत्नी असलेल्या यामी गौतमने नुकतेच सांगितले की, 'धुरंधर २'मध्ये अनेक कॅमियो भूमिका असणार आहेत. हे कॅमियो कथेला अधिक थरारक व रोचक बनवणार असल्याचे तिने स्पष्ट केले. यामी स्वतःही या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार तिने शूटिंग पूर्ण केले आहे आणि तिची भूमिका अ‍ॅक्शनने भरलेली असणार आहे. 

यामी गौतमने दिलेल्या संकेतांनुसार, चित्रपटात प्रेक्षकांना काही अनपेक्षित सरप्राइज पाहायला मिळणार आहेत. आदित्य धर यांच्यासोबत 'उरी'मध्ये काम केलेला विकी कौशल कॅमियो भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. आता या चित्रपटात नक्की कोण-कोण दिसणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

१९ मार्चला चित्रपटगृहात

येत्या १९ मार्च रोजी 'धुरंधर २ : द रिव्हेंज' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी १९ मार्च ही तारीख निवडण्यात आली आहे, कारण याच काळात ईद, गुढीपाडवा यांसारखे सण येतात. तर थिएटर रीलिजनंतर 'धुरंधर २ : द रिव्हेंज' JioHotstar वर प्रदर्शित केला जाणार आहे. जर तुम्ही अद्याप 'धुरंधर' पाहिला नसेल तर तो नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar 2' Surprise: Yami Gautam Reveals Vicky Kaushal Cameo?

Web Summary : Yami Gautam hints at cameos in 'Dhurandhar 2,' possibly including Vicky Kaushal. The film, a sequel to the hit 'Dhurandhar,' promises action and surprises. Releasing March 19th, it will stream on JioHotstar after its theatrical run.
टॅग्स :रणवीर सिंगबॉलिवूडयामी गौतमविकी कौशल