Join us

'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती'; लग्नानंतर पत्नीसोबत बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे रणदीप ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 16:33 IST

Randeep hooda नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ही जोडी केरळला पोहोचली. मात्र, येथील काही फोटो त्यांनी पोस्ट केल्यामुळे ते ट्रोल झाले.

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डा (Randeep hooda) याने त्याच्या लाँग टाइम गर्लफ्रेंड लीन लॅशराम (lin laishram) हिच्यासोबत लग्न केलं. अत्यंत साध्या पद्धतीने रणदीप आणि लीन यांनी लग्नगाठ बांधली त्यामुळे या जोडीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. परंतु, यावेळी ही जोडी त्यांच्या काही बोल्ड फोटोमुळे ट्रोल झाली आहे. 

सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकानेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ३१ डिसेंबरचे वेगवेगळे प्लॅन आखले होते. यात रणदीप आणि लीन ही जोडी सुद्धा त्यांचा ३१ डिसेंबर सेलिब्रेट करायला केरळला पोहोचले. परंतु, या ठिकाणचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

केरळला गेलेल्या रणदीप आणि लीन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये लीनने मोनोकिनी परिधान केली होती. या कपड्यांमध्ये तिने रणदीपसोबत काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.

काय म्हणाले नेटकरी?

'तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं', असं एका युजरने म्हटलं आहे. तर, 'लग्नानंतर मला एवढंच करायचं होतं', 'ही आपली संस्कृती नाही', असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

कोण आहे रणदीपची पत्नी लीन?

लीन लॅशराम ही पहिली मणिपुरी मॉडेल आहे जिने स्वीमसूट परिधान केला होता. परंतु, पडद्यावर स्वीमसूट घातल्यामुळे तिच्या घरातल्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. लीनने काही सिनेमांमध्ये मुख्य भूमिकाही साकारल्या होत्या परंतु, ते सिनेमा काही कारणास्तव रिलीज झाले नाहीत. गेल्या ४-५ वर्षांपासून लीन मुंबईत राहत असून तिच्या फिल्मी करिअरकडे लक्ष देत आहे.

बिझनेस वूमन आहे लीन

लीन धनुर्विद्येत कुशल असून ती धनुर्विद्येमध्ये ज्युनिअर नॅशनल चॅम्पिअन ठरली आहे. इतकंच नाही तर बिझनेस वूमन आहे. तिचा स्वत:चा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. दरम्यान, रणदीप आणि लीन यांची पहिली भेट २०१८ मध्ये एका स्टेडिअममध्ये झाली होती. त्यानंतर मैत्री आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. ४-५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :रणदीप हुडाबॉलिवूडटेलिव्हिजनसेलिब्रिटी