Join us

...म्हणून अ‍ॅनिमलच्या ट्रेलर लाँचला गैरहजर होते अनिल कपूर; रणबीर कपूरने सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 17:22 IST

अभिनेते अनिल कपूर या ट्रेलर लाँचला गैरहजर होते. याचं खरं कारण काय आहे याचा खुलासा रणबीर कपूरनं केला आहे. 

अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी बहुचर्चित 'अ‍ॅनिमल' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून रणबीरचे चाहते अक्षरश: सरप्राईज झालेत.  दिल्लीत सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. अभिनेते अनिल कपूर या ट्रेलर लाँचला गैरहजर होते. याचं खरं कारण काय आहे याचा खुलासा रणबीर कपूरनं केला आहे. 

अनिल कपूर अनुपस्थितीबद्दल रणबीर विचारले असता तो म्हणाला, 'अनिल कपूर सध्या दुबईत आहेत. हा कार्यक्रम 21 तारखेला होणार होता. परंतु काही कारणांमुळे तो पुढे ढकलला गेला.  ते चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहेत. हा चित्रपट अनिल सरांशिवाय शक्यच झाला नसता'. 

'अ‍ॅनिमल' हा पिता-पुत्राचा बंध दाखवणारा चित्रपट आहे. यात अनिल कपूर आणि रणबीर कपूर बाप लेकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आपला बाप आपल्यावर खूश व्हावा म्हणून मुलगा कोणत्याही थराला जाताना दिसतो. लेकाच्या मनात बापाविषयी जेवढा आदर आहे तेवढाच रागही असल्याचं स्पष्ट दिसून येतं. तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूडअनिल कपूर