Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाइट्स, कॅमेरा आणि अ‍ॅक्शन... आता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर येणार चंदेरी दुनियेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 14:20 IST

अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा देखील लाइट्स, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर कुटुंबाची मजबूत पकड असूनही दिवंगत अभिनेते ऋषी कपूर-अभिनेत्री नीतू कपूर यांची मुलगी आणि अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने स्वत:ला सिनेसृष्टीपासून दूर ठेवले आहे. तिनं बॉलिवूडकडे न वळता ज्वेलरी डिझाइनमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि तेच तिनं करिअर म्हणून निवडलं. पण, आता रिद्धिमा देखील लाइट्स, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे.

चित्रपट निर्माता करण जोहर निर्मित  'द फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज'  या वेब रिअ‍ॅलिटी शोच्या तिसर्‍या सीझनमध्ये रिद्धिमा सहभाग घेणार असल्याची माहिती आहे. या शोचे पहिले दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यात नीलम कोठारी, महीप कपूर, भावना पांडे आणि सीमा सजदेह यांनी सहभाग घेतला होता.   

 'द फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज' चा सिझन 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे शुटिंग हे मुंबई आणि दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील तीन व्यावसायिक महिला, रिद्धिमा कपूर साहनी, कल्याणी साहा चावला आणि शालिनी पासी यांचे जीवन दाखवले जाणार आहे. 

रिद्धिमा कपूर साहनी ही त्या स्टार किड्सपैकी एक आहे, जी फिल्म जगतात सक्रिय नसूनही सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध आहेत. तिचे सोशल मीडियावर लाखों चाहते आहेत. रिद्धिमा कपूरचे फॅशन आणि ज्वेलरी-डिझाइनर फॅशनच्या जगात एक मोठे नाव आहे.  रिद्धिमा कपूरचं लग्न उद्योगपती भरत साहनीशी झालं आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूडसिनेमा