Join us

Ranbir Kapoor : 'सतत तेच तेच पाहून लोकांना...', रणबीर कपूरने सांगितलं सोशल मीडियावर न येण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 16:13 IST

अभिनेता रणबीर कपूर आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला नेहमी एक प्रश्न विचारला जातो, ते म्हणजे तू सोशल मीडियावर (Social Media) का नाही? रणबीर कपूर बॉलिवूडमधील त्या मोजक्या कलाकारांपैकी एक आहे जे सोशल मीडियापासून लांबच आहेत. सैफ अली खान (Saif Ali Khan), राणी मुखर्जी (Rani Mukherjee), रणबीर कपूर सारखे काही कलाकार सोशल मीडियापासून दूरच राहणं पसंत करतात. रणबीरने नुकतेच यावर भाष्य केले आहे.

अभिनेता रणबीर कपूर आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनसाठी तो वेगवेगळ्या शहरात अनेक इव्हेंट्समध्ये सहभागी होत आहे. व नुकत्याच एका इव्हेंटमध्ये रणबीरने सोशल मीडियावर का येत नाही याचा खुलासा केला. तो म्हणाला, 'जेव्हा कोणी सोशल मीडियावर असतं तेव्हा त्याला मनोरंजन करण्याच्या दृष्टीने स्वत:ला सादर व्हावं लागतं. माझ्यात ती गोष्टच नाहीए. मला असं वाटतं आजकाल अभिनेता आणि अभिनेत्रीची जी मिस्ट्री आहे ती संपत चालली आहे.आम्ही सिनेमा करतो, मार्केटिंग करतो, जाहिराती करतो त्यामुळे कुठे ना कुठे तेच तेच पाहून प्रेक्षकांनाही कंटाळा येतो.याला खूप वेळा पाहिलं आता काहीतरी नवीन मजेदार पाहतो. त्यामुळे मी जर थोडी फार माझी मिस्ट्री कायम ठेऊ शकलो तर लोकांना कदाचित वाटेल अरे खूप दिवसांनी याचा सिनेमा येतोय, पाहूया.' रणबीर कपूर आगामी 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याची आणि श्रद्धा कपूरची फ्रेश जोडी आहे. ८ मार्च रोजी सिनेमा रिलीज होतोय. तर रणबीरचा त्यानंतर 'अॅनिमल' हा सिनेमा देखील रिलीजसाठी सज्ज आहे.

टॅग्स :रणबीर कपूरसिनेमासोशल मीडिया