Join us

आलियाच्या Wedding Ringने वेधल्या उपस्थितांच्या नजरा; या कारणामुळे प्रचंड खास आहे तिची रिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 14:05 IST

Ranbir Alia Wedding: लग्नात आलियाने घातलेल्या वेडिंग रिंगची चर्चा रंगली आहे. ही रिंग अनेक कारणांसाठी खास असल्याचं म्हटलं जातं.

बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्स या नावाने ओळखली जाणारी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या जोडीने काल थाटात लग्न केलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या जोडीची चर्चा रंगली आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण या जोडीवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सोबतच या लग्नातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचाही ते प्रयत्न करत आहेत. यामध्येच आता लग्नात आलियाने घातलेल्या वेडिंग रिंगची चर्चा रंगली आहे. ही रिंग अनेक कारणांसाठी खास असल्याचं म्हटलं जातं.

...म्हणून आलियाची वेडिंग रिंग आहे खास

या लग्नात आलियाच्या वेडिंग लूकसोबतच तिची वेडिंग रिंग चर्चेत आली आहे. सध्या तिच्या या अंगठीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिची अंगठी दिसून येत आहे. ही रिंग विशिष्ट पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. या रिंगमध्येही रणबीरच्या लकी नंबरचा समावेश आहे.

आलियाची रिंग ही आठ हिऱ्यांपासून तयार करण्यात आली आहे. ही अंगठी लंडनमधील एक नामांकित ब्रँडने तयार केली आहे. विशेष म्हणजे ही अंगठी साधीसुधी नसून कोट्यवधी रुपयांची आहे.

दरम्यान, या लग्नसोहळ्यातील आलियाच्या वेडिंग लूकची विशेष चर्चा रंगली. तिच्या मंगळसूत्रापासून ते कलिरापर्यंत अनेक गोष्टींमध्ये रणबीरच्या लकी नंबरचा समावेश करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठरणबीर कपूरआलिया भटबॉलिवूडसेलिब्रिटी