आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची जगभरात चर्चा आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा आणि इंडस्ट्रीतील कलाकारांचाही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सिनेसृष्टीतील अनुभवी, प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही सिनेमा पाहून मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीट करत सिनेमाचं कौतुक केलं. ते पाहून आदित्य धरही भारावला. काय म्हणाले राम गोपाल वर्मा?
राम गोपाल वर्मांनी ट्वीट करत लिहिले, "धुरंधर फक्त सिनेमा नाही तर भारतीय सिनेसृष्टीचं चित्र पालटणारा सिनेमा आहे. भारतीय सिनेसृष्टीचं भविष्य आदित्य धरने एकहाती बदललं आहे. मग ते नॉर्थ असो किंवा साऊथ...याचं कारण धुरंधर फक्त सिनेमा नाही तर मोठी झेप आहे. सिनेमाने जे कमावलं आहे ते नुसत्या स्केलवर नाही तर याआधीच कधीच न अनुभवलेलं यश आहे. आदित्यने इथे फक्त सीन दिग्दर्शित केलेले नाही तर प्रत्येक कॅरेक्टर आणि प्रेक्षक सर्वांच्याच मानसिकतेची काळजी घेतली आहे. टेक्निकली हा सिनेमा भारतीय सिनेमाची नवी परिभाषा लिहित आहे. साऊंड डिझाईनने फक्त सीनला डेकोरेट केलेलं नाही तर स्टॉक केलं आहे. अॅक्शन ही फक्त कोरियोग्राफी नाही. एक खरी हिंसा जाणवत आहे."
"रणवीरने थोडं मागे येत अक्षय खन्नाला फ्रेम व्यापणाची संधी दिली हे शानदार आहे. कारण हीच कथेची गरज होती आणि रणवीरला सिनेमाची समज आहे. धुरंधरचं यश पुढचा ब्लॉकबस्टर नाही तर फिल्म इंडस्ट्रीने आता प्रगती करावी यासाठी दिलेली वॉर्निंगच आहे."
राम गोपाल वर्मांच्या या शब्दांनी आदित्य धरही भारावला. एक दिवस त्यांच्यासोबत काम करायचं हे आदित्यचं स्वप्न होतं जे पूर्ण झालं नाही. पण अप्रत्यक्षरित्या आपण त्यांच्यासोबतच सिनेमा केल्याची भावना त्याने ट्वीट करत मांडली.
'धुरंधर' सिनेमाने आतापर्यंत ४०० कोटी पार कमाई केली आहे. लवकरच सिनेमा ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल असा अंदाज आहे. तसंच पुढील वर्षी १९ मार्च रोजी 'धुरंधर' पार्ट २ रिलीज होणार आहे.
Web Summary : Ram Gopal Varma lauded 'Dhurandhar' as revolutionary, praising Aditya Dhar's direction, sound, and action. He noted Ranveer's support for Akshay Khanna. Varma sees the film's success as a warning for industry progress. A sequel is planned.
Web Summary : राम गोपाल वर्मा ने 'धुरंधर' को क्रांतिकारी बताया, आदित्य धर के निर्देशन, ध्वनि और एक्शन की प्रशंसा की। उन्होंने अक्षय खन्ना के लिए रणवीर के समर्थन को नोट किया। वर्मा फिल्म की सफलता को उद्योग की प्रगति के लिए चेतावनी के रूप में देखते हैं। सीक्वल की योजना है।