सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव काही दिवसांपूर्वी वेगळ्याच कारणाने चर्चेत होता. चेक बाऊन्सप्रकरणी तो तिहार कारागृहात होता. तो स्वत:च तुरुंगात शरण आला होता. एका सिनेमाच्या निर्मितीचे पैसे थकवल्याने त्याला तुरुंगात जावं लागलं होतं. त्याच्यावर ५ कोटींचं कर्ज होतं. काही रक्कम भरल्यानंतर त्याची जेलमधून जामिनावर सुटका झाली. दरम्यान आता राजपाल यादवची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. मला पैसे नाहीत म्हणून तुरुंगात जावं लागलं नाही, मला पैशांची अडचण कधीच नव्हती असा खुलासा त्याने केला.
राजपाल यादवने शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवर आपल्या कायदेशीर लढाईबाबत खुलासा केला. त्याला विचारण्यात आले की, '५ कोटी रुपये फेडण्यात तुम्हाला अडचण तर यायला नको होती?' यावर राजपाल यादव म्हणाला, "हाच तर नेमका प्रश्न आहे. ज्या दिवशी लोकांना हे समजेल, त्या दिवशी त्यांना माझे पूर्ण प्रकरण लक्षात येईल. पैसे नाहीत म्हणून मला तुरुंगवास झाला नव्हता. हा मोठ्या मुद्द्याचा आणि तत्त्वांचा विषय होता. जर हा केवळ ५ कोटींचा विषय असता, तर तो २०१२ मध्येच मिटला असता. या ५ कोटींच्या प्रकरणामुळे माझे १७ कोटी रुपये बुडाले आहेत."
तो पुढे म्हणाला, "एका फिल्म प्रोजेक्टसाठी माझ्यासोबत काही लोक जोडले गेले होते. मात्र सिनेमाच्या रिलीजआधी अडचणी आल्या. इंडस्ट्रीत १०० सिनेमांपैकी २० सिनेमे चालतात. ८० सिनेमे अपयशी होतात. जर एखादा सिनेमा फ्लॉप झाला तर याचा अर्थ त्यात काही फसवणूक झाली असा होत नाही. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ही लढाई मी सुरु केलीच नव्हती पण आता ती मीच संपवणार."
राजपाल यादव सध्या 'भूत बंगला' सिनेमात दिसत आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या सिनेमात अक्षय कुमार, परेश रावल, असरानी असे एकापेक्षा एक कलाकार आहेत. याशिवाय राजपाल अक्षय कुमार-प्रियदर्शन यांच्याच आगामी 'हैवान' सिनेमातही दिसणार आहे.
Web Summary : Rajpal Yadav clarified he went to jail for principles, not lack of funds, in a check bounce case involving a film project. He claims the 5 crore issue led to a larger 17 crore loss, but he trusts the judiciary and intends to resolve it.
Web Summary : राजपाल यादव ने स्पष्ट किया कि वह सिद्धांतों के लिए जेल गए थे, न कि धन की कमी के कारण, एक फिल्म परियोजना से जुड़े चेक बाउंस मामले में। उन्होंने दावा किया कि 5 करोड़ के मुद्दे से 17 करोड़ का बड़ा नुकसान हुआ, लेकिन उन्हें न्यायपालिका पर विश्वास है और वे इसे हल करने का इरादा रखते हैं।