Join us

ऐश्वर्या राय आणि अनिल कपूरच्या Fanney Khanमध्ये रजनीकांत यांची एंट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 16:56 IST

सध्या ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार यांची मुख्य भूमिका असलेला फन्ने खां कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहे.

ठळक मुद्दे‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहेचित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत

सध्या ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार यांची मुख्य भूमिका असलेला फन्ने खां कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहे. नुकतेच 'फन्ने खां'चे पोस्टर रिलीज करण्यात आले. या पोस्टरमध्ये ऐश्वर्या आणि राजकुमारसोबत रजनीकांत सुद्धा दिसतायेत. चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये ऐश्वर्याला रशी बांधण्यात आलेली दिसतेय. तर राजकुमार रावने एक ओढणीत आपला चेहरा लपवला आहे तर अनिल कपूर यांनी रजनीकांत यांचा रोबोटमधला मुखवटा लावला आहे. 

रंजक गोष्ट ही आहे की ऐश्वर्या आणि रजनीकांत यांनी रोबोटमध्ये एकत्र काम केले होते. या पोस्टरमुळे तुम्हाला पुन्हा एकदा दोघे एकत्र काम करत असल्याचा आभास होऊ शकतो. 

'फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत. ‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. चित्रपटात राजकुमार राव ऐश्वर्याच्या प्रियकाराची भूमिका साकारणार आहे.  3 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानंतर ती रात और दिनच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. यात काम करण्यासाठी ऐश्वर्याने 10 कोटींचे मानधन मागितले आहे. या चित्रपटात ऐश्वर्या रायचा डबल रोल असणार आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी विशेष तयारी करावी लागणार आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनरजनीकांतराजकुमार रावअनिल कपूर