Aishwarya Rai Bachchan, will make a slight reduction in honor? | ऐश्वर्या राय बच्चन, मानधनात थोडी कपात करशील का?

 बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘फन्ने खां’चे शूटींग सुरू झालेय. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. याच चित्रपटाशी संबधित एक बातमी आहे. होय, ताजी बातमी खरी मानाल तर, या चित्रपटासाठी ऐश्वर्याने तिच्या मानधनात थोडी कपात करावी, अशी विनंती तिला केली गेली आहे. ऐश्वर्याचा हा चित्रपट आधी क्रिअर्ज एंटरटेनमेंटच्या प्रेरणा अरोरा प्रोड्यूस करणार होत्या. पण काही कारणास्तव आता हा चित्रपट टी सीरिजचे भूषण कुमार प्रोड्यूस करताहेत. टी-सीरिजने चित्रपटाच्या प्रॉडक्शन कॉस्टवर फेरविचार चालवला आहे. म्हणजेच चित्रपटाचा खर्च कशाप्रकारे कमी करता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. सूत्रांचे मानाल तर याच प्रयत्नाअंतर्गत यात काम करत असलेल्या कलाकारांच्या मानधनात काहीप्रमाणात कपात होऊ शकते. ऐश्वर्याला तर तशीच विनंतीचं करण्यात आल्याचे कळतेय. अर्थात अद्याप या वृत्ताला ऐश्वर्याने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. केवळ ऐश्वर्यालाचं मानधन कमी करण्यात आल्याची विनंती करण्यात आली की, चित्रपटाचे अन्य स्टार म्हणजेच अनिल कपूर आणि राजकुमार राव यांनाही अशी विनंती केली गेली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऐश्वर्याबद्दल बोलायचे झाल्यास ती ही विनंती मान्य करते की नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

ALSO READ : ऐश्वर्या रायच्या 'फन्ने खां'चा बॉक्स ऑफिसवर 'या' चित्रपटासोबत होणार सामना

२०१६ मध्ये आलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ​ऐश बघावयास मिळाली होती. सध्या ती ‘फन्ने खां’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती एका गायिकेची भूमिका साकारत आहे. आॅस्कर नामांकित ‘एव्रीबडीस फेमस’ या डच चित्रपटाचा ‘फन्ने खां’ हा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल मांजरेकर करीत आहेत, तर ऐशसह चित्रपटात अनिल कपूर, राजकुमार रावची महत्त्वाची भूमिका आहे. 
ऐश्वर्या राय आणि अनिल कपूूर तब्बल दोन दशकानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करीत आहेत. या अगोदर हे दोघे २००० साली आलेल्या ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘ताल’ या सुपरहिंट चित्रपटांमध्ये झळकले होते. आता पुन्हा एकदा ही जोडी मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी येत आहे. 
Web Title: Aishwarya Rai Bachchan, will make a slight reduction in honor?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.