Join us
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान दुबईत कुटुंबासोबत अडकला आर.माधवन? स्वतःच शेअर केले अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:22 IST

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आखाती देशांमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन आपल्या कुटुंबासह दुबईत अडकल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली.

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आखाती देशांमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन आपल्या कुटुंबासह दुबईत अडकल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. यामुळे त्याचे चाहते प्रचंड काळजीत पडले होते. मात्र, आता स्वतः माधवनने या सर्व अफवांना पूर्णविराम देत चाहत्यांना महत्वाची अपडेट दिली आहे.आर. माधवन हा आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवण्यासाठी दुबईत असल्याचे समजताच, या युद्धादरम्यान तो तिथे अडकला तर नाही ना? अशी भीती सोशल मीडियावर व्यक्त केली जाऊ लागली. पण या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर माधवन म्हणाला त्यानुसार, तो सध्या दुबईत नसून US मध्ये आहे. तो पूर्णपणे सुरक्षित असून काळजी घेणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत. जोवर युद्धजन्य परिस्थिती सुरळित होत नाही, तोवर तो अमेरिकेतच राहणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. माधवनने स्वतःच सांगितल्याने चाहत्यांनी सुटकेच श्वास सोडला आहे.माधवन जरी सुरक्षित असला तरीही सोनल चौहान, नर्गिस फाखरीसारखे काही बॉलिवूड अभिनेते आणि आंतरराष्ट्रीय कलाकार या युद्धाच्या वातावरणात अडकले असल्याचं समजतंय. या कलाकारांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. हे कलाकारही लवकरात लवकर भारतात आणि त्यांच्या मायदेशात परततील, अशी चाहत्यांना आशा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांच्या संपर्कात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : R. Madhavan safe in US, not stuck in Dubai.

Web Summary : Amidst Iran-Israel tensions, rumors spread that R. Madhavan was stuck in Dubai. He clarified he's safe in the US, not Dubai. Other Bollywood actors are reportedly caught in the conflict zone. Fans express concern and hope for their safe return.
टॅग्स :आर.माधवनयुद्धइराणइस्रायलइस्रायल - हमास युद्धबॉलिवूड