Join us

Pushpa 2 Teaser Out: कुठे आहे पुष्पा? पाहा पुष्पा-2चा नवा टीझर; पाहून तुम्हीही म्हणाल, जबरदस्त...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 17:24 IST

Pushpa 2 Teaser Out: 'पुष्पा २'च्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मेकर्सनी चाहत्यांना मोठं गिफ्ट देत, 'पुष्पा २'चा नवा टीझर रिलीज केला आहे.

Pushpa 2 Teaser Out:  साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर फिल्म 'पुष्पा २'च्या (Pushpa 2) टीझरच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मेकर्सनी चाहत्यांना मोठं गिफ्ट देत, 'पुष्पा २'चा नवा टीझर रिलीज केला आहे.दोन दिवसांआंधी मेकर्सनी रश्मिका मंदानाच्या वाढदिवशी या टीझरची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला होता. या टीझरमध्ये दिग्दर्शक सुकुमार यांनी 'पुष्पा २'ची पहिली झलक चाहत्यांना दाखवली होती.  'पुष्पा' तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचं यात दाखवण्यात आलं होतं. आता नव्या टीझरमध्ये पुष्पाराजची झलक पाहायला मिळतेय.

पुष्पाराजच्या शोधात भटकत असलेल्या पोलिसांच्या हाती महिनाभरानंतर त्याचा एक व्हिडीओ लागतो. हा व्हिडीओ जंगलातील आहे. ८ गोळ्या लागल्यानंतरही पुष्पा जिवंत असल्याचं यात दिसतं. जंगलात प्राण्यांचे फोटो घेण्यासाठी लावलेल्या वनविभागाच्या कॅमेऱ्यात पुष्पा दिसतो. पुष्पाला पाहून वाघही दचकतो. 'पुष्पा २'मधील पुष्पाराजचा लुक एकदम जबरदस्त आहे. हा टीझर पाहताना अंगावर काटा येतो.  सोशल मीडियावर हा टीझर पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. 

नव्याने शूट होणार सिनेमा?पहिल्या पार्टची कथा जिथे संपली, तिथून Pushpa 2: The Ruleची कथा सुरू होणार आहे. अर्थात हा सिनेमा कधी रिलीज होतोय, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. चर्चा खरी मानाल तर,  आत्तापर्यंत शूट केलेल्या सीन्सबद्दल दिग्दर्शक सुकूमार समाधानी नाहीत. काही सीन्स रिशूट करण्याचा त्यांचा विचार आहे. असं झालं तर ‘पुष्पा 2’चं प्रदर्शन आणखी लांबणार आणि चाहत्यांची प्रतीक्षाही वाढणार. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनTollywood