Join us

प्रियंका चोप्रा बनणार Jr NTR ची हिरोईन? KGF फेम दिग्दर्शकाच्या सिनेमात फ्रेश जोडी दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 14:19 IST

सध्या ज्युनिअर एनटीआर 'देवरा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर फिल्मला मिळालेल्या अद्भुत यशानंतर आता ज्युनिअर एनटीआरचे (Jr NTR) चाहते त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचा अभिनय बघून 'गार्डियन ऑफ द गॅलक्सी' फेम दिग्दर्शक जेम्स गन देखील त्याच्यासोबत काम करण्यात उत्सुक आहेत मात्र सध्या साऊथ अभिनेत्याजवळ भारतातच अनेक प्रोजेक्ट्स आहेत. सध्या ज्युनिअर एनटीआर 'देवरा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांच्याही भूमिका आहेत. तर त्याच्या आणखी एका सिनेमात ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) दिसण्याची शक्यता आहे.

'केजीएफ' (KGF) सारखा सुपरहिट सिनेमा देणारे दिग्दर्शक प्रशांत नील (Prashant Neel) यांच्यासोबत ज्युनिअर एनटीआर काम करणार आहे. या सिनेमासाठी सुरुवातीला दीपिका पदुकोण, मृणाल ठाकुर यांची नावं समोर येत होती. भारत पाकिस्तान युद्धावर आधारित या अॅक्शन सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून दुसरी तिसरी कोणी नाही तर थेट प्रियंका चोप्राची निवड करण्यात आली आहे. मात्र अद्याप मेकर्सकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. 

रिपोर्ट्सनुसार, ज्युनिअर एनटीआर हृतिक रोशनच्या 'वॉर 2' मध्येही दिसणार आहे. दोघांमध्ये जबरदस्त अॅक्शन बघायला मिळेल. तसंच हा सिनेमा 'ब्रह्मास्त्र' फेम दिग्दर्शक अयान मुखर्जी दिग्दर्शित करणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :ज्युनिअर एनटीआरप्रियंका चोप्रासिनेमाकेजीएफ