बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) . 'देसी गर्ल' म्हणून जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या प्रियांकाने हॉलिवूडमध्ये तिचा चांगलाच जम बसवला आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनास (Nick Jonas) याच्यासोबत लग्नगाठ (Marriage) बांधली असून सध्या त्यांच्या नात्याविषयी अनेक अफवा पसरत आहेत. याच अफवांवर प्रियांकाने भाष्य केलं आहे. अलिकडेच प्रियांकाने variety ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आणि निकच्या नात्याविषयी भाष्य केलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष प्रियांकाकडे वेधलं आहे.
निकसोबतच्या नात्याविषयी काय म्हणाली प्रियांका?
"आमच्या लग्नाला ८ वर्ष झाली आहेत.आणि, लोक आजही आमचं नातं तुटावं याची वाट पाहत असतील तर मग तो त्यांचा विचार झाला. आता मी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणंच बंद केलंय. मुळात मला हेच कळत नाही की आमच्या नात्याचा लोकांना नेमका त्रास काय आहे?," असं प्रियांका म्हणाली. ''लोकांनी आमच्या वेगळ्या देशावरुन, वेगळ्या धर्मावरुन आणि वयातील अंतरवरुनही ज्या चर्चा केल्या त्याही खूप त्रासदायक होत्या'', असंही प्रियांकाने यावेळी सांगितलं.
'आमचं नातं तुटावं याची लोक वाट पाहतायेत'
पुढे प्रियांका म्हणाली, "बाहेर ज्या चर्चा होतायेत, अफवा पसरतायेत त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. लोक आमचं नातं तुटायची वाट पाहतायेत. पण, या चर्चा म्हणजे फक्त पाण्यासारख्या आहेत. ज्याप्रमाणे बदकाच्या पंखावरुन पाणी अलगदपणे खाली पडतं. तसंच या चर्चा आमच्यासाठी आहेत. त्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि विचार केला की, या सगळ्याचा आपल्याला काहीही फरक पडत नाही.
दरम्यान, प्रियांका आणि निकने केवळ ६ महिने एकमेकांना डेट केलं. आणि, त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतलं. या जोडीच्या लग्नाला ८ वर्ष झाली असून त्यांना एक गोंडस मुलगीदेखील आहे. या मुलाखतीमध्ये प्रियांकाने निकचं कौतुकही केलं. इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा लोकांना परिस्थितीनुसार बदलावं लागतं. मात्र, ''कोणतीही परिस्थिती असली तरीदेखील निक कधीच बदलत नाही. आमच्या नात्यावर तो कोणताही परिणाम होऊ देत नाही", असंदेखील ती यावेळी म्हणाली.
Web Summary : Priyanka Chopra dismisses rumors about her marriage with Nick Jonas, stating people have been waiting for their relationship to end. She emphasizes their bond remains strong despite external opinions and cultural differences. They are unbothered by the negativity.
Web Summary : प्रियंका चोपड़ा ने निक जोनास के साथ अपनी शादी के बारे में अफवाहों को खारिज किया, कहा कि लोग उनके रिश्ते को खत्म होने का इंतजार कर रहे हैं। उन्होंने जोर देकर कहा कि बाहरी राय और सांस्कृतिक मतभेदों के बावजूद उनका बंधन मजबूत बना हुआ है। वे नकारात्मकता से बेपरवाह हैं।