Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमार व सोनू सूदचा ‘पृथ्वीराज चौहान’ रिलीजआधीच सुपरडुपरहिट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 17:11 IST

सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा

ठळक मुद्देखरे तर हा सिनेमा यावर्षी रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे शूटींग थांबले. आता हे शूटींग नोव्हेंबरमध्ये पूर्ण केले जाणार आहे.

ऐतिहासिक सिनेमांचा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे, हे बॉलिवूडला आता कळून चुकले आहे. जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत, पानीपत, तान्हाजी या सर्व सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. तान्हाजी या अलीकडच्या सिनेमाने तर कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडलेत. आता असाच एक सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे ‘पृथ्वीराज चौहान’. अक्षय कुमारसोनू सूदचा हा आगामी सिनेमा रिलीजआधीच सुपरडुपर हिट मानला जात आहे.अक्षय कुमार लोकांचा आवडता अभिनेता आहे, त्यामुळे आधीच प्रेक्षक या सिनेमासाठी उत्सुक होते. मात्र आता सोनू सूद आहे म्हटल्यावर  चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने ज्याप्रकारे लोकांची मदत केली, स्थलांतरीत मजुरांसाठी जीवाचे रान केले, ते पाहून लोक सोनू सूदच्या अक्षरश: प्रेमात पडले आहेत. सोनूची रिअल हिरोची प्रतीमा तयार झाली आहे. त्यामुळे ‘पृथ्वीराज चौहान’मधील सोनूच्या भूमिकेची आत्तापासूनच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झालीय.

अक्षय व सोनू दोघांची जोडी प्रेक्षकांसाठी व्हिज्युअल ट्रिटपेक्षा कमी नाही. याचमुळे ‘पृथ्वीराज चौहान’ बॉक्स ऑफिसवर धमाका करणार असे मानले जात आहे. हा सिनेमा इतकी जबरदस्त कमाई करेल की येणा-या अनेक वर्षे त्याचे रेकॉर्ड कोणी तोडू शकणार नाही, असेही जाणकारांचे मत आहे.

 पृथ्वीराज चौहान यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा अक्षय व सोनूचा हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या बिग बजेट सिनेमात चित्तथरारक अ‍ॅक्शन सीन्सची भरमार असणार आहे. चित्रपट स्वत: अक्षय कुमार आणि आदित्य चोप्रांनी प्रोड्यूस केला आहे. चंद्रप्रकाश् द्विवेदी हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

खरे तर हा सिनेमा यावर्षी रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे शूटींग थांबले. आता हे शूटींग नोव्हेंबरमध्ये पूर्ण केले जाणार आहे. यानंतर 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :सोनू सूदअक्षय कुमार