Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिती झिंटाच्या जुळ्या मुलांचा पहिला फोटो आला समोर; photo पाहून नेटकऱ्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 11:48 IST

Preity zinta: अलिकडेच प्रिती दोन जुळ्या बाळांची आई झाली आहे. प्रितीने सरोगसी पद्धतीने तिच्या बाळांना जन्म दिला आहे.

आपल्या निखळ हास्यामुळे प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारी डिंपल गर्ल म्हणजे प्रिती झिंटा (preity zinta). गेल्या काही वर्षांमध्ये प्रितीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय असून कायम चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. अलिकडेच प्रिती दोन जुळ्या बाळांची आई झाली आहे. प्रितीने सरोगसी पद्धतीने तिच्या बाळांना जन्म दिला आहे. प्रितीने ही गुडन्यूज शेअर केल्यापासून तिच्या बाळांना पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. यामध्येच तिने तिच्या बाळांचा फोटो शेअर केला आहे.

सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ सुरु आहे. यात चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात पहिला सामना रंगला. त्यानंतर पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये दुसरा सामना रंगला. यात प्रिती पंजाब किंग्सची मालकिन असून ती घरी बसून हा सामना पाहात होती. विशेष म्हणजे यावेळी तिच्या सोबत तिचे दोन चिमुकली मुलंही हा सामना पाहात होती. त्यामुळे आपल्या मुलांचा हा गोड फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

"नवी टीम, नवा कॅप्टन आणि नवीन चाहते. फँटास्टिक रन चेजसाठी आणि Jai , Gia च्या पहिल्या आयपीएल मॅचचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी धन्यवाद पंजाब किंग्स मी माझं हसू आवरु शकत नाहीये", असं कॅप्शन प्रितीने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, या पोस्टच्या माध्यमातून प्रितीने पहिल्यांदाच तिच्या बाळांची झलक दाखवली. या फोटोमध्ये तिच्या बाळांचा चेहरा पूर्णपणे दिसत नसला तरीदेखील केवळ त्यांचं डोकं पाहायला मिळत आहे. मात्र, प्रितीच्या बाळांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या फोटोवर केवळ तासाभरात १ लाखांपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत. प्रिती वयाच्या ४६ व्या वर्षी जुळ्या मुलांची आई झाली आहे.  प्रितीने 

टॅग्स :प्रीती झिंटाबॉलिवूडसेलिब्रिटीआयपीएल २०२३