Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रीती झिंटानं विकला बांद्रा येथील आलिशान फ्लॅट; तब्बल 'इतक्या' कोटींना झाली डील,किंमत वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 10:55 IST

डिंपल गर्ल प्रीती झिंटा झाली मालामाल! मुंबईतील सर्वात महागड्या परिसरातील फ्लॅटची केली विक्री, तब्बल इतक्या कोटींना झाला व्यवहार

Preity Zinta: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा.अभिनेत्रीने तिचा दमदार अभिनय आणि परफॉर्मन्सच्या आधारावर चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या गालावरच्या खळीचे तर आजही लाखो दिवाने आहेत. ९० च्या दशकामध्ये आपल्या सुंदर अभिनयानं आणि अदाकारिमुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी प्रीती झिंटा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी प्रीती तिचा कोणत्या चित्रपटामुळे नाहीतर कोट्यवधी रुपयंच्या मालमत्तेच्या व्यवहारामुळे चर्चेत आली आहे. 

CRE Matrix यांच्या माहितीनुसार, अभिनेत्रीने यांनी मुंबईतील बांद्रा परिसरातील ही अपार्टमेंट एकूण १८.५० कोटी रुपयांना विकली आहे. या  अपार्टमेंटचा कार्पेट एरिया ८४७ चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया १,७७० चौरस फूट आहे. प्रीतीचा हा फ्लॅट ११ व्या मजल्यावर आहे. शिवाय या मालमत्तेची नोंदणी २ मार्च २०२६ रोजी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा परिसर मुंबईतील सर्वात महागड्या आणि मागणी असलेल्या परिसरांपैकी एक मानला जातो, जिथे अनेक सिनेस्टार्स आणि प्रमुख बिझनेसमन राहतात. 

प्रीतीने तिचा फ्लॅट भारतीय वंशाच्या एका अमेरिकन नागरिकाला विकला. अभिनेत्रीने हे अपार्टमेंट प्रिया नगर आणि राजीव नगर यांना विकलं आहे, ज्यासाठी त्यांनी ₹१.११ कोटी स्टॅम्प ड्युटी आणि अंदाजे ₹३०,००० नोंदणी शुल्क भरल्याचं सांगण्यात येतंय. ही इमारत बरीच जुनी होती आणि तिचा पुनर्विकास करण्यात आला होता. पुनर्विकासानंतर, तिथे ज्यांच्याकडे फ्लॅट होते त्या सर्वांना नवीन फ्लॅट मिळाले. प्रीतीलाही एक फ्लॅट मिळाला होता. आता, प्रितीने तोच फ्लॅट विकला आहे. अलिकडेच चार महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये, प्रिती झिंटाने मुंबईत आणखी एक फ्लॅट ₹१४ कोटींमध्ये विकला होता. तो फ्लॅट देखील त्याच इमारतीत होता, असं म्हटलं जात आहे. 

प्रीती झिंटाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती आमिर खानची निर्मिती असलेल्या खानच्या 'लाहोर १९४७'या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सनी देओलसोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

English
हिंदी सारांश
Web Title : Preity Zinta sells Bandra flat for crores; stuns with deal.

Web Summary : Preity Zinta sold her Bandra apartment for ₹18.5 crore to an American citizen. The 1,770 sq ft flat is on the 11th floor. She previously sold another flat in the same building for ₹14 crore. Zinta will appear in 'Lahore 1947' with Sunny Deol.
टॅग्स :प्रीती झिंटाबॉलिवूडबांधकाम उद्योग