Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश राज यांनी शेअर केलं कंगना रनौतचं मीम, म्हणाले - कंगना राणी लक्ष्मीबाई आहे तर मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 12:27 IST

प्रकाश राज यांनी नुकतीच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील वादावर कमेंट केलीय. त्यांनी आता कंगनाला टार्गेट करत एक मीम शेअर केलंय. ज्यात कंगना राणी लक्ष्मीबाई असल्याचं सांगण्यावरून खिल्ली उडवली आहे.

आपल्या जबरदस्त कामासाठी आणि सरकार विरोधातील वक्तव्यांमुळे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज राजकारणातही अ‍ॅक्टिव राहतात. ते नेहमी राजकारणावरून बोलत असतात. त्यांनी नुकतीच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील वादावर कमेंट केलीय. त्यांनी आता कंगनाला टार्गेट करत एक मीम शेअर केलंय. ज्यात कंगना राणी लक्ष्मीबाई असल्याचं सांगण्यावरून खिल्ली उडवली आहे.

प्रकाश राज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक मीम शेअर केलंय ज्यावर लिहिलंय की, कंगना जर सिनेमा करून स्वत:ला राणी लक्ष्मीबाई समजत असले तर या हिशेबाने दीपिकाही पद्मावती, हृतिक अकबर, शाहरूख अशोक, अजय देवगन भगत सिंह, आमिर खान मंगल पांडे आणि विवेक ओबेरॉय मोदीजी झालेत. प्रकाश राज यांच्या या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण जास्तीत जास्त लोक वेगवेगळ्या कलाकारांच्या भूमिका आठवून गंमत करत आहेत.

याआधी प्रकाश राज यांनी कंगनाला Y दर्जाची सुरक्षा दिल्यावरही तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी एअरपोर्टवर गार्डसोबत चालणाऱ्या कंगनाच्या फोटोसोबत पायी चालणाऱ्या प्रवासी मजूरांचा फोटो शेअर करत लिहिले की, हा आहे न्यू इंडिया.

भाजपावर नेहमीच टिकेची झोड उठवणारे अभिनेते प्रकाश राज हे लोकसभा निवडणुकीत बंगळुरू मध्यतून उभे होते. पण त्यांना यात पराभवाचा सामना करावा लागला होता. कामाबाबत सांगायचं तर प्रकाश राज हे आगामी 'केजीएफ २' मध्ये दिसणार आहेत. यात सुपरस्टार यशसोबत संजय दत्त मुख्य भूमिकेत आहे.

कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

एकीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी कंगनाबाबत बोलण्याचे टाळण्यास सुरुवाच केली असली तरी कंगना राणौतकडून याविषयी ट्विटरवरून टिवटिव सुरूच आहे. दरम्यान, आज कंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगनाने शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

महान नेते असलेले बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वात आवडीच्या नेत्यांपैकी आणि आदर्शांपैकी एक होते. कधीतरी शिवसेना गटातटाच्या राजकारणात सामील होईल आणि काँग्रेस बनेल, अशी भीती त्यांना वाटायची. आता त्यांच्या पक्षाची सध्याची पाहून त्यांची भावना काय असली असती. 

हे पण वाचा :

VIDEO : राखी सावंत कंगनाला म्हणाली भीकारी, बोलली - 'मुंबईत इतकी भीती वाटते तर आली कशाला?'

घटनेनं दिलेले आमचे हक्क वाचवण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा; ठाकरे सरकारविरुद्ध कंगनानं दंड थोपटले

कंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल, बाळासाहेबांची मुलाखत शेअर करत लगावला टोला

कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो'

टॅग्स :प्रकाश राजकंगना राणौतबॉलिवूड