घटनेनं दिलेले आमचे हक्क वाचवण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा; ठाकरे सरकारविरुद्ध कंगनानं दंड थोपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 10:32 PM2020-09-11T22:32:29+5:302020-09-11T22:33:08+5:30

कंगनानं शुक्रवारी आणखी एक व्हिडीओ पोस्ट करून महाराष्ट्र सरकारची दहशत व अत्याचार वाढत असल्याचा आरोप केला

The Center should intervene to protect our rights given by the Constitution; Kangana Ranaut slams Uddhav Thackeray government | घटनेनं दिलेले आमचे हक्क वाचवण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा; ठाकरे सरकारविरुद्ध कंगनानं दंड थोपटले

घटनेनं दिलेले आमचे हक्क वाचवण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा; ठाकरे सरकारविरुद्ध कंगनानं दंड थोपटले

Next

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut) आणि शिवसेना ( Shiv Sena) या वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. कंगनानं मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर केलेल्या आरोपानंतर मुंबई महानगरपालिकेकडून झालेल्या कारवाईमुळे हा वाद आणखी चिघळला. त्यात कंगनानं शुक्रवारी आणखी एक व्हिडीओ पोस्ट करून महाराष्ट्र सरकारची दहशत व अत्याचार वाढत असल्याचा आरोप केला. शिवाय तिनं घटनेनं दिलेले आमचे हक्क वाचवण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. 

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा, अन्यथा...; उदयनराजेंचा इशारा 

...तर कुणी आंदोलन करेल असं वाटत नाही; मराठा आरक्षण स्थगितीवर शरद पवारांनी सुचवला तोडगा

नेमकं प्रकरण काय? 
शुक्रवारी शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कांदिवली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनीच स्वत; तक्रार दिली आहे. त्यानंतर, भादंवि अनुसार 325, 143, 147, 149 अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. फिर्यादी मदन शर्मा यांच्या तक्रारीवरुन आरोपी कमलेश कदम व त्याच्या 8 ते 10 साथीदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

''एका महिलेवर ताकद आजमावल्यानंतर उद्धव यांचे कार्टून व्हाट्सएप वर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी घरात घुसून मदन शर्मा या माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली, त्यांचा डोळा फोडला. याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला असला तरी सत्तापिसाटांचा हा माज उतरवण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आयुष्यातील काही वर्षे खर्ची घातली असे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना भुरट्या शिवसैनिकांनी केलेली मारहाण पक्षाची मानसिकता दाखवणारी आहे. जे घराबाहेर पडण्याची हिंमत दाखवून शकले नाहीत त्यांचे चेले वृद्धाना ताकद दाखवतायत.'', असे भातखळकर यांनी म्हटलं आहे. 


कंगना काय म्हणाली?
महाराष्ट्रात सरकाराची दहशत आणि अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज त्यांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यांची चूक हीच होती की, त्यांनी सरकारची निंदा केली. घटनेनं दिलेल्या हक्कांची गळचेपी होत आहे. माझी केंद्राकडे विनंती आहे की, त्यांनी यात हस्तक्षेप करावा आणि आणि घटनेनं आम्हाला दिलेल्या अधिकारांचं रक्षण करावं.

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020त सुरेश रैनाच्या जागी CSK ट्वेंटी-20तील नंबर वन खेळाडूला ताफ्यात घेणार? 

IPLमधील सर्वोत्तम कर्णधार कोण? आकडेवारी सांगते रोहित शर्मा अन् MS Dhoni नव्हे, तर... 

Indian Premier League 2020मधील टॉप 10 महागड्या खेळाडूंत केवळ चार भारतीय!

आठ दिवसांवर आली IPL 2020; जाणून घेऊया असे 8 विक्रम जे मोडणे अशक्यच!

विराट कोहली अन् RCB पाहतायेत IPL 2020 जेतेपदाचे स्वप्न, पण संघात आहे का तेवढा दम?

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा Killer Look पाहिलात का? CSKनं पोस्ट केला खास फोटो

जोफ्रा आर्चरचा भन्नाट चेंडू, उडवला डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा; मार्श-मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियाची लाज राखली

Web Title: The Center should intervene to protect our rights given by the Constitution; Kangana Ranaut slams Uddhav Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.