Join us

Prakash Raj : सावधान! प्रकाश राज यांनी हिटलरशी केली मोदींची तुलना, 'कोलाज' फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 09:30 IST

प्रकाश राज यांनी मोदींवर ट्वीट करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

प्रसिद्ध साऊथ अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) नेहमी राजकारणाविषयी काही ना काही वादग्रस्त विधान करत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांची, ट्विट्सची चर्चा होत असते. आता नुकतंच त्यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोकडे लक्ष जायचं कारण की हिटलर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Narendra Modi) तुलना असलेला कोलाज फोटो ट्वीट केला आहे.

कुंपणामागे हिटलर तर दुसऱ्या बाजुला काही लहान मुलं दिसत आहेत. असा तो पहिला फोटो आहे. तर त्यालाच जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. तर मोदींमोर अनेक लोक हातात मोबाईल घेऊन उभे आहेत. मात्र दोन्ही फोटोत सारखं म्हणजे नेता आणि जनता यांच्यामध्ये काटेरी कुंपण आहे.

या फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहिले,"इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. भविष्य हे काटेरी कुंपणामागे आहे. सावधान." असं सुचक ट्वीट करत त्यांनी मोदींवर टीका केली आहे. प्रकाश राज यांनी मोदींवर ट्वीट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेक अशी विधानं केली आहेत. तर त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

टॅग्स :प्रकाश राजनरेंद्र मोदीट्विटर