Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारच्या फ्लॅटनंतर आता खरेदी केली आलिशान कार, कोण आहे २४ वर्षीय कंटेंट क्रिएटर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 10:49 IST

सध्या एका प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरची चर्चा रंगली आहे.

सध्या एका प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरची चर्चा रंगली आहे. या प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने काही दिवसांपुर्वी बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा फ्लॅट खरेदी केला होता. त्यानंतर आता आलिशान गाडी खरेदी केली आहे.  या कंटेंट क्रिएटर तरुणीचं वय हे फक्त २४ वर्ष आहे. इतक्या कमी वयात स्वतःचं हक्काचं घरं आणि गाडी घेतल्यानं तिचं चहूबाजूने कौतुक होतं आहे.

ही प्रसिद्ध कंटेट क्रिएटर म्हणजे चांदनी भाभदा आहे. सोशल मीडियावर ती चांदनी मिमिक या नावाने लोकप्रिय आहे. चांदनीनं स्वतःलाच एक नवीकोरी गाडी गिफ्ट केली आहे. कलाकार मंडळींच्या आलिशान गाड्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. आपल्याकडे हक्काची गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न चांदनीनं पाहिलं आणि ते पुर्णही केलं आहे. चांदनीने सोशल मीडियावर नव्या कोऱ्या गाडीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. कलाकार मंडळींसह, इतर कंटेंट क्रिएटर्स व चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. 

चांदनी ही आलिया भट्टची हुबेहुब मिमिक्री करते. तिच्या या कौशल्याच आलियासह अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं आहे. तिच्या या कौशल्याचे आलियाने देखील कौतुक केलं होतं. अशा या प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर चांदनी भाभदाने काही महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा फ्लॅट खरेदी केला होता. चांदनीने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. ती व्हीजे म्हणजे व्हिडीओ जॉकी आहे. पण ती पूर्णपणे वेळ कंटेंट क्रिएटरचं काम करते.

टॅग्स :सेलिब्रिटीसोशल मीडियासोशल व्हायरलअक्षय कुमारकार