Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी तिथून पळ काढला पण..'; Ex-boyfriend लीक केला होता पूनम पांडेचा प्रायव्हेट व्हिडीओ; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 14:22 IST

Poonam pandey: पूनमचा हा खासगी व्हिडीओ त्या काळी प्रचंड व्हायरल झाला होता. इतकंच नाही तिचे बाथरुममधील काही फोटोही समोर आले होते. या संबंधित प्रकारानंतर युट्यूबने तो व्हिडीओ ब्लॉक केला.

पूनम पांडे (Poonam pandey) हे नाव कोणासाठीही नवीन नाही. बोल्ड कंन्टेट आणि व्हिडीओमुळे ती कायम चर्चेत असते. तिच्या या बोल्डनेसमुळे तिला अनेक काही वादविवादांनाही सामोरं जावं लागलं आहे. काही वर्षांपूर्वी पूनमचा एक खासगी व्हिडीओ लीक झाला होता. तिच्या या बाथरुममधील लीक झालेल्या व्हिडीओवर आता तिने मोठा खुलासा केला आहे. तिचा हा व्हिडीओ खुद्द तिच्या बॉयफ्रेंडनेच लीक केल्याचं तिने म्हटलं आहे.

पूनमचा हा खासगी व्हिडीओ त्या काळी प्रचंड व्हायरल झाला होता. इतकंच नाही तिचे बाथरुममधील काही फोटोही समोर आले होते. या संबंधित प्रकारानंतर युट्यूबने तो व्हिडीओ ब्लॉक केला. अलिकडेच पूनमने Hauterrfly ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने या व्हिडीओविषयी मोठा खुलासा केला आहे.

बॉयफ्रेंडने लीक केला पूनमचा प्रायव्हेट व्हिडीओ

"मला आजही तो प्रसंग आठवतोय आणि तो मी कधीही विसरणार नाही. आमच्या दोघांचं भांडण सुरु होतं आणि मला स्वत:ला वाचवायचं होतं. त्याने रागाच्या भरात ट्रिमर उचचला आणि माझे केस कापायला पुढे सरसावला. पण, कसंबसं करुन मी तो ट्रिमर त्याच्या हातातून हिसकावला आणि तिथून पळाले. मी तिथून पळ काढला पण माझ्या फोन त्याच खोलीत राहिला होता. मी रडत रडत घरी पोहोचले आणि घडलेलं सगळं वडिलांना सांगितलं. त्यानंतर माझ्या वडिलांनी त्याला बोलवून घेतलं आणि तू माझ्या मुलीसोबत हे असं का वागतोस याचा जाब विचारला", असं पूनम म्हणाली.

पुढे ती सांगते, "त्या भांडणानंतर त्याने मला माझे खासगी व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली. पण मला वाटलं हा उगाच असं काहीतरी बोलत असेल. पण, तो इतका खालच्या पातळीला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. त्याने माझ्या वडिलांच्या फोनवर कॉल केला आणि जर तू परत आली नाहीस तर तुझे व्हिडीओ लीक करेन अशी धमकी दिली. मी येणार नाही, असं मी ठामपणे त्याला सांगितलं. त्यावर, मी खरोखर तुझे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करेन असं तो म्हणाला आणि त्याने खरंच केले."

दरम्यान, "त्या व्हिडीओमुळे माझं आयुष्य उद्धवस्त झालं.  मी त्या काळात आर्थिक समस्यांचाही सामना करत होते. मला वाईट तर त्या गोष्टीचं वाटलं ज्यावेळी त्याच्या मित्राने त्याच्या या वागण्याचं समर्थन केलं आणि त्याचं कौतुक केलं", असंही ती म्हणाली. पूनमने नशा, द जर्नी ऑफ कर्मा अँड लव इन टॅक्सी यांसारख्या सिनेमात ती झळकली. तसंच ती लॉकअप या शोमध्येही दिसली होती.

टॅग्स :पूनम पांडेसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा