Join us

Malaika Arora :  मलायका अरोराच्या घरी पोहोचले मुंबई पोलिस, व्हिडीओ व्हायरल; काय आहे भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 12:26 IST

Police reached Malaika Arora's house : मलायका अरोराच्या घरी पोलीस दाखल झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आला आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली.

सलमान खानला  (Salman Khan) धमकीचं पत्र मिळाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असताना अचानक  एक व्हिडीओ समोर आला आणि सगळीकडे याच व्हिडीओची चर्चा रंगली. या व्हिडीओत मुंबई पोलिस अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora ) घरी दाखल झाल्याचं दिसतंय.व्हायरल व्हिडीओमध्ये मलायका सोफ्यावर बसलेली असून पोलिस अधिकारी तिच्यासमोर उभे असलेले व तिच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर आला आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली.

मुंबई पोलिस मलायकाच्या घरी का पोहोचले? मलायकाची कशाबद्दल चौकशी केली गेली? असे प्रश्न चाहत्यांना पडले. तुम्हालाही हेच प्रश्न पडले असतील तर जर थांबा. कारण हा मामला चौकशीचा वगैरे नसून वेगळाच आहे.होय, पोलिस मलायकाच्या घरी गेले होते. पण चौकशीसाठी नव्हे तर तिला निमंत्रण द्यायला. मुंबई पोलिसांच्या एका कार्यक्रमात मलायका सहभागी होणार आहे. याच कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी पोलिस मलायकाला भेटले.

मलायकाबद्दल सांगायचं तर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका व अर्जुन सतत या ना त्या कारणानं चर्चेत असतात. याशिवाय मलायकाच्या फॅशन सेन्सची, सोशल मीडियावरच्या तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंची चर्चाही सुरू असते. मलायका नुकतीच तुर्कीला हॉलीडेवर गेली होती. या ट्रिपचे फोटो व व्हिडीओ तिने शेअर केले होते. अलीकडे  करण जोहरच्या बर्थ डे पार्टीमध्ये देखील मलायकाला हॉट अवतारात स्पॉट करण्यात आलं.

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडमुंबई पोलीस