Join us

Pathaan Movie : पठाणचा ट्रेलर का नाही आला ? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:10 IST

शाहरुखचे चाहते तर वाट पाहत आहेत ते म्हणजे पठाणचा ट्रेलर कधी येतोय याची.

Pathaan Movie : बॉलिवुड किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) तब्बल ४ वर्षांनी पठाण सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येतोय. पठाणची गाणी आणि टीझर अनेकांना आवडलाय. शाहरुखचे चाहते तर वाट पाहत आहेत ते म्हणजे पठाणचा ट्रेलर कधी येतोय याची. शाहरुख खानच्या ASK SRK या ट्विटरवरील सेशनमध्ये एका चाहत्याने थेट ट्रेलरवरुन प्रश्न विचारला आहे. तर यावर शाहरुखने काय उत्तर दिले बघा.

मेरी मर्जी...

शाहरुख खान ask srk या ट्विटरवरील प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. दरम्यान एका चाहत्याने पठाणचा ट्रेलर का रिलीज केला नाही असा प्रश्न विचारला. तर यावर शाहरुख म्हणाला 'हो हो, मेरी मर्जी...जेव्हा यायचा तेव्हा येईलच.'

तर दुसरीकडे शाहरुख खानचे पठाणमध्ये सिक्स पॅक्स अॅब्स दिसत आहेत. शाहरुखचा शर्टलेस फोटो शेअर करत चाहत्याने विचारले, यासाठी किती वेळ लागला ? तर यावर शाहरुखने 'भाऊ, ५७ वर्ष.'! असा भन्नाट रिप्लाय दिला आहे.

सध्या बॉलिवुडमध्ये बॉयकॉटचे वारे वाहत आहेत. पठाणवरही जोरदार टीका होत आहे. अशातच अद्याप ट्रेलर रिलीज न झाल्याने चाहत्यांना प्रश्न पडला आहे. २५ जानेवारी रोजी पठाण रिलीज होत असून यामध्ये दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांची मुख्य भुमिका आहे. तर पठाणनंतर शाहरुख खान जवान, डंकी या सिनेमांमध्येही दिसणार आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानट्विटरदीपिका पादुकोणजॉन अब्राहम