Join us

राघव चड्डाचं नाव ऐकताच परिणीती लाजली ना राव! Video व्हायरल; लग्नाच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 11:47 IST

परिणीती लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरु आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. आम आदमी पार्टीचे नेता राघव चड्डा (Raghav Chadha) यांच्यासोबत परिणीती लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघे लंच आणि डिनर साठी भेटले होते. तेव्हा दोघांना पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले. यानंतर परिणीती मनिष मल्होत्राच्या घरी गेल्याने तर चर्चांना उधाणच आलं. नुकतीच परिणीती मुंबई विमानतळावर दिसली. तेव्हा राघव चड्डा यांचा विषय काढताच ती लाजली.

परिणीती आणि राघव चड्डा लवकरच लग्न करु शकतात. आपचे नेता संजीव अरोडा यांनी थेट ट्वीट करत दोघांना शुभेच्छा दिल्याने बातमीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र परिणीती किंवा राघव दोघांपैकी एकानेही अद्याप या चर्चांवर मौन सोडलेले नाही. परिणीतीचा मुंबई विमानतळावरचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. यामध्ये परिणीती येताच पापाराझी तिला विचारतात, 'मॅडम ज्या चर्चा सुरु आहेत त्या खऱ्या आहेत का?' यावर परिणीती काहीच बोलत नाही मात्र व्हिडिओत स्पष्ट लाजताना दिसत आहे. परिणीतीला लाजताना बघून बातमी नक्कीच खरी आहे असं आता वाटतंय. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

राजकारणी आणि बॉलिवूड यांच्यात सूत जुळणं हे काही पहिल्यांदाच घडत नाहीए. याआधीही अशा जोड्या झाल्या आहेत. नुकतीच अभिनेत्री स्वरा भास्करनेही राजकारण्याशी लग्न केले. समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमदसह तिने लग्नगाठ बांधली. आता चाहत्यांना परिणीतीच्या लग्नाची उत्सुकता आहे.

टॅग्स :परिणीती चोप्राआम आदमी पार्टीलग्नबॉलिवूड