Join us

नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:22 IST

या धमक्यांना पल्लवी जोशी एक पत्नी म्हणून कशी सामोरी जाते यावर नुकतंच तिने उत्तर दिलं आहे.

मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi)  काही काळापासून हिंदी सक्रीय आहे. पती विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri) अनेक सिनेमांमध्ये दिसली आहे. 'द काश्मीर फाईल्स' आणि आता 'द बंगाल फाईल्स' हा त्यांचा सिनेमा रिलीज होणार आहे. विवेक अग्निहोत्रींचे अनेक सिनेमे हे वादातच अडकले आहेत. त्यांना कित्येकदा जीवे मारण्याची धमकीही येते. या धमक्यांना पल्लवी जोशी एक पत्नी म्हणून कशी सामोरी जाते यावर नुकतंच तिने उत्तर दिलं आहे.

'द बंगाल फाईल्स' निमित्त पल्लवी जोशीने नुकतीच 'टेली टॉक'ला मुलाखत दिली. यावेळी नवऱ्याला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर ती म्हणाली,"मी याचा जास्त विचारच करत नाही. मी त्या धमक्या ऐकतच नाही आणि पाहतही नाही. कारण मी सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसते. त्यामुळे या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. जर या गोष्टींमुळे माझ्यावर परिणाम झाला तर मी नवऱ्याला सतत मागे खेचत राहीन. मला त्याला त्याच्या कामापासून रोखायचं नाही त्यामुळे मी स्वत:वर परिणाम होऊ देत नाही. आम्ही दोघंही सोबत काम करतो त्यामुळे जितका तो त्याचा सिनेमा आहे तितकाच माझाही आहे. जितकी हिंमत त्याला दाखवावी लागेल तितकंच मलाही हिंमतीने घ्यावं लागेल."

मोठे बॅनर्स अप्रोच का करत नाही? यावर पल्लवी म्हणाली, "मी त्याबद्दल विचार करण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच उत्तर मिळालं नाही. त्यामुळे मी आता विचार करणं सोडलं. विवेक माझ्यासाठी चांगल्या भूमिका लिहितो आणि मी दावा करु शकते की जितक्या आव्हानात्मक भूमिका तो मला देतो तितक्या बाहेर कोणीच देऊ शकत नाही. मला माझी क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे आणि माझी ही इच्छा आमच्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये पूर्ण होत आहे त्यामुळे आणि काय हवं?"

टॅग्स :पल्लवी जोशीविवेक रंजन अग्निहोत्रीबॉलिवूड