Join us

Video: भारताने सामना जिंकल्याने सैरभैर झाला पाकिस्तानी स्टार, चालू गाडीतच आरडाओरडा करुन राग काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:47 IST

भारताने सामना जिंकल्याने सैरभैर झाला पाकिस्तानी स्टार, चालू गाडीत केला आरडाओरडा. व्हिडीओ व्हायरल

काल भारतानेपाकिस्तानला चॅम्पियन्स लीगच्या (ind vs pak) सामन्यात पराभूत केलं. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. सुरुवात चांगली होऊनही पाकिस्तानचे मधल्या फळीतील फलंदाज बाद झाले. त्यामुळे पाकिस्तानची धावसंख्या गडगडली. अखेर कोहलीच्या (virat kohli) शतकाच्या जोरावर याशिवाय शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने केलेल्या तडाखेबंद फलंदाजीच्या साथीने भारताने पाकिस्तानला सहज हरवलं. या सामन्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओत पाकिस्तानी स्टार चालू गाडीत आक्रोश करताना दिसतोय.

पाकिस्तान हरल्याने स्टार झाला सैरभैर

"मारो मुझे मारो", "अचानक वक्त बदल गया, जजबात बदल गए" या डायलॉगने काही वर्षांपूर्वी व्हायरल झालेला सोशल मीडिया स्टार मोमिन साकिब. मोमिन भारत-पाकिस्तानच्या प्रत्येक सामन्यावेळी त्याची प्रतिक्रिया देताना दिसतो. मोमिन काल पाकिस्तानचा सामना बघायला दुबईला गेला होता. भारताविरुद्ध पाकिस्तानने सामना हरल्याने मोमिनने चालू गाडीत आक्रोश केला. पाकिस्तान हरल्याने मोमिनला खूप दुःख झालं अन् त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. मोमिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

मोमिन साकिबने व्हिडीओ शेअर करुन सांगितलंय की, "मला फ्रस्ट्रेट होण्याचा हक्क आहे. जर असंच चालू राहिलं तर.. आधी आपण म्हणायचो की इंडिया-पाकिस्तान मॅच खूप कमी पाकिस्तानी प्रेक्षक बघायला यायचे. जर गेम असाच चालू राहिला तर कोणीच मॅच बघायला स्टेडियममध्ये येणार नाही. या पद्धतीने पाकिस्तानी क्रिकेट पाहण्यासाठी लोकांचा इंटरेस्ट कमी होईल. जी मुलं लाहोर, इस्लामाबाद, कराचीच्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळतात त्यांची क्रिकेट खेळण्याची आवड कमी होईल. माझ्याकडे शब्द नाहीत अजिबात." अशाप्रकारे मोमिनने त्याचा राग व्यक्त केलाय.

टॅग्स :भारतपाकिस्तानविराट कोहलीगुन्हेगारी