Join us

तीन वेळा मोडला बॉलिवूड अभिनेत्रीचा संसार; चौथ लग्न करुन झाली पाकिस्तानात स्थायिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 12:19 IST

zeba bakhtiar: 1991 साली प्रदर्शित झालेल्या 'हिना' या सिनेमामध्ये जेबी मुख्य भूमिकेत झळकली होती.

90 चं दशक गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जेबा बख्तियार (Zeba Bakhtiar) . एकेकाळी आपल्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. राज कपूर यांच्या सिनेमातूनबॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जेबाने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, एकाएकी तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. सध्या ही अभिनेत्री पाकिस्तानमध्ये तिचं आयुष्य व्यतीत करत असल्याचं सांगण्यात येतं.

1991 साली प्रदर्शित झालेल्या 'हिना' या सिनेमामध्ये जेबी मुख्य भूमिकेत झळकली होती. या सिनेमात तिने दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा त्याकाळी तुफान गाजला होता. विशेष म्हणजे या सिनेमामुळे चर्चेत आलेली जेबा मधल्या काळात तिच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत आली.  जेबाने तब्बल४ वेळा लग्नगाठ बांधली. सध्या जेबा पाकिस्तानमध्ये राहत आहे.

जेबीने पहिलं लग्न पाकिस्तानमधील सलमान वल्लियानी यांच्यासोबत केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर जेबीने अभिनेता जावेद जाफरी डेट केलं. काही वर्ष डेट केल्यानंतर तिने जावेद जाफरीसोबत लग्न केलं. मात्र, तिचा हा संसारही टिकला नाही. कायदेशीररित्या ही जोडी विभक्त झाली.दोन संसार मोडल्यानंतर जेबीने अदनान सामीसोबत तिसरं लग्न केलं. सूत्रांच्या माहितीनुसार, जेबी आणि अदनान यांना एक मुलगादेखील आहे. परंतु, अदनानसोबतही तिचं बिनसलं आणि ती वेगळी झाली. विशेष म्हणजे जेबीने आता पाकिस्तानी व्यक्ती सोहेल याच्यासोबत लग्न केलं असून ती पाकिस्तानमध्ये स्थायिक आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा