Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळी धुणीभांडी करायची 'ही' मराठमोळी अभिनेत्री; बॉलिवूडची खलनायिका म्हणून मिळाली प्रसिद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 19:39 IST

Shashikala: मराठीसह बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीच्या खलनायिकी भूमिका विशेष गाजल्या

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय. त्यामुळे आज जरी हे कलाकार त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल, महागड्या वस्तू, आलिशान घरे यांच्यामुळे चर्चेत येत असले तरीदेखील त्यांनी यामागे खूप मोठा स्ट्रगल केला आहे. आज अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत. या अभिनेत्रीचं निधन होऊन बरीच वर्ष लोटली. मात्र, त्यांची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही. विशेष म्हणजे एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीने लोकांच्या घरी धुणीभांडी केली आहेत.

वयाच्या 88 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या अभिनेत्री शशिकला (shashikala) साऱ्यांच्याच स्मरणात असतील. मराठीसह बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीच्या खलनायिकी भूमिका विशेष गाजल्या. लहानपणापासून नृत्य आणि अभिनयाची आवड असणाऱ्या या अभिनेत्रीने तरुण वयात मोठ्या कष्टात दिवस काढले.शशिकला यांचं बालपण मोठ्या आनंदात गेलं. मात्र वडिलांचा व्यवसाय डबघाईला गेल्यानंतर त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलं. परिणामी, कुटुंब सावरण्यासाठी वडिलांनी मुंबई गाठली. मात्र, येथे जम बसवणंही त्यांना कठीण जात होतं. त्यामुळे शशिकला यांना लोकांच्या घरी जाऊन धुणीभांडी करावी लागली. एका मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं होतं.

दरम्यान,  त्यांचे पती शौकत रिझवी यांच्या ओळखीमुळे त्यांना ‘झीनत’ चित्रपटात काम मिळालं. या भूमिकेसाठी त्यांना त्याकाळी २० रुपये मिळाले होते. या सिनेमानंतर त्या जुगनू, 'आरती' ,हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर  या सिनेमांमध्ये काम केलं. तसंच त्यांनी 'किसे अपना कहें', 'सोनपरी', 'जिना इसी का नाम है' या मालिकांमध्ये काम केलं. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा