Join us

गणपती बाप्पा मोरया! नववर्षाच्या पहिल्या दिवशी कार्तिक आर्यन सिद्धीविनायकाच्या चरणी नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 16:53 IST

सध्या संपूर्ण देशभरात नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येत आहे.

Kartik Aaryan: सध्या संपूर्ण देशभरात नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येत आहे. सर्वसामान्यांसह कलाकारमंडळी देखील आपआपल्या पद्धतीने न्यू इअर सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. दरम्यान,  नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) गणपती बाप्पाच्या चरणी लीन झाला आहे. २०२५ चा पहिला दिवस उजाडताच अभिनेत्याने मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराला भेट देत बाप्पाचं दर्शन घेतलं.

नुकताच सोशल मीडियावरकार्तिक आर्यनचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेर येताना दिसतोय. व्हिडीओमध्ये तो गळ्यात लाल पिवळ्या रंगाचं उपरणं तसेच कपाळावर टिळा अशा लूकमध्ये पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर कार्तिक आर्यनचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. 

दरम्यान, कार्तिक आर्यन त्याच्या 'भूलभुलैय्या-३' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला. या चित्रपटात त्याने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. लवकरच कार्तिक  'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्यप्रेम की कथा चे दिग्दर्शक समीर विध्वंस या सिनेमाचे दिग्दर्शनाची धूरा सांभाळणार आहेत. २०२६ पर्यंत हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया